पुणे येथील जेष्ट विधिज्ञ,वकील भास्करराव आव्हाड यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने वकीली क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
अल्पपरिचय
वकिली आणि सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे कार्यरत असलेल्या ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांचा जन्म नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका खेड्यात झाला.
जिल्हा परिषद शाळेतील मातृभाषेतून शिक्षण, शेतकरी सर्वसामान्य कुटुंबातील जन्म अशी पार्श्वभुमी असतांना आव्हाड यांनी सर्व न्युनगंडावर मत करीत आपले कर्तुत्व सिद्ध केले होते .त्यांना लाभलेल्या वारकरी संप्रदाय, शेतकरी कुटुंब, आई-वडलांच्या संस्कारांची शिदोरी यांच्या जोरावार त्यांच्या त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वात प्रामाणिकपणा, निष्ठा, सत्वशिलता या त्रिसुत्रींचा अंगीकार केला आणि यशाचे शिखर पादाक्रांत केले.
इंग्रजी नावाची भाषा असते, हे ही माहित नसलेल्या ऍड आव्हांडांनी त्यांच्या वकीलीच्या कार्यकाळात अनेक केसेस इंग्रजी भाषेत लढविल्या.
भास्करराव आव्हाड यांना महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थानी अनेक पुरस्कारानी गौरवले होते. केवळ वकिलीच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक, क्षेत्रात वावर असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवासह विविध वकिल संघटनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. राज्यातील विविध सामाजिक संस्थांच्या कार्यकारिणीवर देखील त्यांचा समावेश होता. तसेच ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. कायद्याचे किचकट विषय शिकवत विद्यार्थींमध्ये लोकप्रिय होणे सोपे नाही. परंतु आव्हाडांनी ते ही करुन दाखविले. वकिली करत असताना त्यांनी अनेक तरुण वकील घडवले आहेत. बदलते कायदे व वकिली आणि न्यायालयीन व्यवस्थेबाबत त्यांनी राज्यभरात शेकडो व्याख्याने दिली आहेत. विविध वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक यातून लेखन करून समाजात कायद्याविषयी जनजागृती व्हावे यासाठी त्यांनी लिहिलेले लेख वाचनीय आहेत. त्यांनी केवळ वकिली केली नाही तर त्यांनी संत साहित्य, अध्यात्म, आदी क्षेत्रात देखील मुशाफरी केली. त्यांचे चिरंजीव अविनाश आव्हाड हे सुद्धा विधिज्ञ आहेत. गेल्या वीस वर्षापासून अविनाश आव्हाड मुंबई उच्च न्यायालयात वकीली करत आहेत. आव्हाड यांचे बंधू सुधाकरराव आव्हाड आणि एकनाथराव आव्हाड हे देखील ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून परिचित आहेत. भास्करराव आव्हाड यांना भावपुर्ण श्रध्दांजली.
Inputs by संजीव वेलणकर,पुणे.
९४२२३०१७३३.