महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या परफाँर्मिंग आर्ट्स
(फिल्म आणि थिएटर) विभागाचे वरिष्ठ सहायक प्रोफेसर तसेच प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक आणि नाट्य समीक्षक डॉ. सतीश पावडे यांना विदर्भ संशोधन मंडळ, नागपूरचा उत्कृष्ट नाट्य समीक्षेचा ‘क्रांतीकारी बाळाजी हुद्दार’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
विदर्भ संशोधन मंडळ, नागपूरचे अध्यक्ष डाँ. मदन कुलकर्णी आणि सचिव डाँ. राजेंद्र वाटाणे यांनी नुकताच ही घोषणा केली आहे. डाँ. सतीश पावडे लिखित आणि विजय प्रकाशन, नागपूर प्रकाशित “द थिएटर आँफ द अँब्सर्ड” या समीक्षा ग्रंथासाठी हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. या पुर्वी या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा, विदर्भ साहित्य संघाचा तसेच मातोश्री सुर्यकांतादेवी पोटे ट्रस्टचा उत्कृष्ट नाट्य समीक्षेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
डॉ. सतीश पावडे यांची आता पर्यंत नाटक, रंगभूमी, भाषांतर आणि नाट्य समीक्षे विषयक २२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे “रंगविमर्श” (हिंदी नाट्य समीक्षा ) आणि,”त्या सायंकाळची गोष्ट”(भाषांतरीत नाटक) ही दोन पुस्तके लवकरच प्रकाशित होत आहेत.
विविध विषयावरील दहा माहितीपट सुद्धा त्यांच्या नावावर आहेत. नभ प्रकाशन अमरावती निर्मित “नाट्यसंवाद” आणि “लोकरंग-देसराग” या नाट्य तसेच लोककला-लोक संगीतावर आधारित “ई-सीरीज चे संयोजन आणि दिग्दर्शनही ते करीत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या नाट्य सेंसाँर बोर्ड आणि मराठी विश्वकोशाच्या ज्ञान मंडळाचे ते सदस्य आणि सल्लागार होते. भारत सरकाच्या संगीत नाटक अकादमीच्या रिसर्च फेलोशिपचेही ते मानकरी आहेत. नाट्यशिक्षण, नाट्य प्रशिक्षण, नाट्यलेखन, नाट्य दिग्दर्शन या सोबतच महाराष्ट्रातील नाट्य समीक्षेचा प्रांतही ते आपल्या लेखनाने समृद्ध करीत आहेत.प्राध्यापक होण्यापूर्वी त्यांनी काही काळ पत्रकारिता केली आहे. अनेक पुरस्कार, मान सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले आहे.
– देवेंद्र भुजबळ:9869484800.