Wednesday, October 15, 2025

‘ती’

नवरात्रोत्सव म्हणजे नवदुर्गा पूजन. स्त्री शक्तीचा जागर… तिचा मान सन्मान… तिचा दृष्टिकोन ! आजची कविता स्त्रीचा दृष्टिकोन काय असतो यावर आहे.
— संपादक

मुलतःच ती प्रेमळ
माया, ममता, करुणा
उपजत तिच्या ठायी
स्वाभिमान मात्र बाणा -१.

समानता वर्तनात
प्रेम प्रेमाला उत्तर
‘अरे’ ला ‘कारे’ करते
उद्धटासी हो ताठर -२.

बाळासाठी मात्र होई
सायीहून मऊ माय
कुणी त्यास दटावता
अंगावर त्याच्या जाय -३.

नको तिला धन,साज
तिचे एकच मागणे
निरंतर तिज हवे
मान देऊन वागणे -४.

आप्तजन देता मान
घेते गगन भरारी
क्षेत्र कोणतेही असो
पादाक्रांत करी नारी -५.

असे ‘ती’ चा दृष्टिकोन
जगा आणि जगू द्यावे
दुनियेत माणसांनी
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे-६.

— रचना : श्रद्धा जोशी. डोंबिवली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप