पुण्याचे लोकप्रिय, धडाडीचे नेते श्री हेमंत रासने ह्यांची प्रेरणादायी जीवन कथा आपल्या पोर्टल वर 2023 साली आणि ते गेल्या वर्षी आमदार म्हणुन निवडुन आल्यावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन्सच्या समाजभूषण पुस्तकात देखील त्यांची जीवन कथा समाविष्ट करण्यात आली आहे. त्यांच्या या जीवन कथेत आता आनंददायी भर पडली आहे.

श्री हेमंत रासने ह्यांची आणि सौ मृणाली यांची कन्या चि. सौ. कां. तेजस्विनी तसेच संगमनेर येथील श्री कैलाश आरगडे आणि सौ. विनिता यांचे सुपुत्र चि.श्री. विनीत यांचा नुकताच विवाह झाला. या शुभ विवाहाच्या निमित्ताने पुणे येथे आयोजित करण्यात आलेला स्वागत समारंभ अत्यंत आनंदात, मंगलमय वातावरणात काल, मंगळवार, 2 डिसेंबर 2025 रोजी संपन्न झाला.

वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः तर उपस्थित होतेच पण विविध जातीचे, धर्माचे, पक्षांचे स्नेही, हितचिंतक, विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, मतदार वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यामुळे हा स्वागत समारंभ म्हणजे जणू राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक ठरला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

एक योगायोग म्हणजे, श्री हेमंत रासने आणि त्यांचे व्याही श्री कैलाश आरगडे हे दोघेही संगमनेर येथील आहेत. तर माझे आजोळ देखील संगमनेर (कै. सोमनाथ गंगाधर रासने हे माझे मामा) हेच आहे.
वधूवराना शुभेच्छा देण्यासाठी माझ्यासमवेत, माझा मित्र, कवी, इंग्रजीचा प्राध्यापक आनंद महाजन हाही असल्याने, माझ्या आनंदात भरच पडली. वधूवरांना सुखी, समृद्ध वैवाहिक जीवनासाठी पुनश्च एकदा मनःपूर्वक शुभेच्छा.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
