Tuesday, June 3, 2025
Homeबातम्यादिव्यांगांची दिव्यार्पण मॅरेथॉन

दिव्यांगांची दिव्यार्पण मॅरेथॉन

पुणे येथील प्रा फाऊंडेशन दिव्यांग मुलांना आनंदाने, स्वाभिमानाने जगण्यासाठी नेहमी प्रेरित करत असते. त्यासाठी व या कार्यात लोक सहभाग निर्माण होण्यासाठी हे फाऊंडेशन सतत काही ना काही कल्पक उपक्रम राबवित असते.

असाच एक छान उपक्रम पुण्यात नुकताच झाला. ‘दिव्यार्पण मॅरेथॉन‘ मध्ये सलग २१ तासात  ५,५५५ पणत्या रंगवून दिव्यांगांनी विक्रमी भरारी घेतली.

प्रा फाऊंडेशन, अनादी… एक विचार आणि भारतमाता महिला मंडळ ट्रस्टच्या या अनोख्या उपक्रमात
प्रा फाऊंडेशन मधील ७५ दिव्यांग मुला-मुलींसह सामान्य नागरिकांनीही सहभाग घेतला.

आयुष्याच्या वाटेवर क्षणाक्षणाला जाणविणा-या अंधाराला पणतीच्या तेजोमय प्रकाशाने आम्ही प्रकाशमान करीत आहोत… तुम्हीही आमच्यासोबत सहभागी व्हा आणि आपल्या आयुष्यात आनंद, ज्ञान आणि उत्साहाची ज्योत पेटवा, असा संदेश देत प्रा फाऊंडेशनमधील दिव्यांग मुला-मुलींनी ५,५५५ पणत्या रंगविण्याचे शिवधनुष्य उचलले.

या अनोख्या उपक्रमाला पुणेकरांनी देखील साथ दिली आणि सलग २१ तास ५ हजारहून अधिक पणत्या रंगवून दिव्यांगांनी दिव्यार्पण मॅरेथॉनमध्ये विक्रमी भरारी घेत आनंदोत्सव साजरा केला.

पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्याहस्ते शनिवारी रात्री ८ वाजता मशाल प्रज्वलित करुन मॅरेथॉनचे उद््घाटन झाले. या उपक्रमात एका वेळेस २० जण याप्रमाणे अनेक उत्साही नागरिक व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. रविवारी, दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे ३ हजारहून अधिक पणत्या रंगवून पूर्ण झाल्या होत्या. यामध्ये प्रत्यक्षपणे ७५ दिव्यांग मुला-मुलींनी देखील उत्साहाने सहभाग घेत पणत्या रंगविल्या.

सायंकाळी ५ वाजता उपक्रम पूर्ण झाल्यानंतर एका धावपटूने मशाल हाती घेऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे जाऊन गणरायाला नमन करीत पणत्या अर्पण केल्या. यावेळी दिव्यांग अवंती क्षीरसागर या मुलीने मंदिराबाहेर पणत्या प्रज्वलित केल्या.

या विषयी बोलताना डॉ.प्राजक्ता कोळपकर म्हणाल्या, प्रा फाऊंडेशनच्या दिव्यांग मुला-मुलींनी यंदाच्या दिवाळीपूर्वी २ लाख पणत्या रंगवून विक्री करण्याचा संकल्प केला आहे. त्या मोहिमेमध्ये दिव्यार्पण मॅरेथॉन हा यशाचे छोटे शिखर पार करीत सर्वांना आनंद देणारा उपक्रम आहे. प्रा फाऊंडेशनमधील दिव्यांग मुलांची ऊर्जा कायम रहावी आणि त्यांनी २ लाख पणत्या विक्री मोहिम पूर्ण करावी, याकरीता सामान्य नागरिक, संस्था, संघटना यांनी मुलांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

या उपक्रमाविषयी माहिती व सहभागाकरीता ९८८१९०७२४१ या क्रमांकावर संपर्क साधून दिव्यांग मुलांना प्रोत्साहित करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्य संकल्पक प्रा फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. प्राजक्ता कोळकर, निशिगंधा कल्लेद, विदुला वढवेकर, प्रियांका शेंडगे-शिंदे, राजाभाऊ शेंडगे, राघव नाफडे, ओंकार साबणे, सायली खळदकर, श्रद्धा पोंक्षे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

– देवेंद्र भुजबळ 9869484800

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. खुपच सकारात्मक आणि उत्साहवर्धक वाटले
    असेच रंगीबेरंगी सुंदर जीवन त्यांना लाभो ही इश्वरचरणी प्रार्थना🙏🙏

  2. दिव्यांगांची marathon पाहून आम्हाला उत्साह वाटला.या काळात सुध्धा किती सकारात्मक विचार असू शकतो त्यांच्या मनात!
    ही दिवाळी त्यांच्या रंगीत पणत्यांनी उजळून जावो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ. सुनीता फडणीस on हेच विसरूनी जाई
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माधव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो !
Shashikant Oak on कथा : २
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on ‘स्नेहाची रेसिपी’ – १७
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनक्रम