आपल्याला कल्पना असेलच की, देवश्री भुजबळ ही सध्या फ्री प्रेस जर्नल या वृत्तपत्रामध्ये प्रिन्सिपल कॉरोस्पॉडंट म्हणून काम करीत आहे. एक्सक्लूझीव्ह बातम्या, लेखमाला, वृत्तांत ही तिच्या पत्रकारितेची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
देवश्री आणि तिचे वरिष्ठ संपादक एस बालाकृष्णन यांच्या पत्रकारितेचा नुकताच माटुंगा येथील रहिवाश्यांनी जाहीर गौरव केला. या रहिवाश्यांनी माटुंगा येथे १२६ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या, रोबोटिक पार्किंग टॉवरला कडाडून विरोध केलेला होता. देवश्री स्वतः याच परिसरात असलेल्या रुईया कॉलेज ची विद्यार्थिनी असल्याने, तिला या प्रश्नाचे गांभीर्य चांगलेच लक्षात आले.तिने या संभाव्य टॉवर विरोधात लेखमालाच सुरू केली. यासाठी तिला तिचे वरिष्ठ संपादक श्री एस बालाकृष्णन यांचे पूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले होते. शेवटी सर्व बाबींचा विचार करून मुंबई महापालिकेच्या वतीने या प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली.

या आनंदाप्रित्यर्थ माटुंगा येथील रहिवाश्यांनी नुकतीच सत्यनारायणाची पूजा घातली होती. याप्रसंगी देवश्री आणि एस बालकृष्णन या दोघांचाही गौरव करण्यात आला. या गौरवाची दखल फ्री प्रेस जर्नल वृत्तपत्र समूहाचे प्रमुख श्री अभिषेक करनानी यांनी देखील घेऊन त्यांनीही या दोघांचे विशेष अभिनंदन केले आहे.
आपल्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टल ची जनक असलेल्या देवश्रीचे आपल्या न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फेही मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
आई-वडिलाप्रमाणेच आपण देखील वृत्तपत्रीय क्षेत्रात चांगले नाव कमवत आहात. याचा आम्हाला अभिमान वाटतो आहे.
यासाठी आपणास अनेक पुरस्कार मिळालेले आहेत याची आम्हाला जाणीव आहे. यामुळे आपणास निश्चितच फायदा होणार आहे आपले मनःपूर्वक अभिनंदन..
देवश्री तुझे खूप खूप अभिनंदन💐
हार्दिक अभिनंदन देवश्री. तुझ्या पत्रकारितेचा उपयोग समाज कार्यासाठी करून अशीच अनेक समाजोपयोगी कार्यात यशप्राप्ती करत राहा. त्यासाठी तुला मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐
हार्दिक अभिनंदन देवश्री. तुझ्या पत्रकारितेचा उपयोग समाज कार्यासाठी करून अशीच अनेक समाजोपयोगी कार्यात यशप्राप्ती करत राहा. त्यासाठी तुला मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐
देवश्री भुजबळ हिचे हार्दिक अभिनंदन.💐 उत्तोरोत्तर अशी अनेक कौतुके आणि पुरस्कार भविष्यात milawoon यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा.
देवश्री तुझे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन❤️🙌
Heartiest congratulations Devashri….Doing a grt job….Best wishes for future plans.
Devashri tuze manapurvak Abhinandan aani pudhil vatchalisathi shubhecha 🤝💐💐💐💐💐💐
देवश्री तुझे खूप खूप अभिनंदन🌹🌹