दहावी, बारावी चे निकाल जाहीर झाले आहेत. कुठला अभ्यासक्रम करावा, कुठे, कसा करावा, हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर पुढील भवितव्य काय असेल ? असे एक ना अनेक प्रश्न सध्या मुलामुलींना आणि त्यांच्या पालकांना भेडसावत आहेत. ही बाब ओळखून प्रख्यात दैनिक पुढारी वृत्तपत्राने उद्या, शुक्रवारी दि. ३० मे आणि परवा, शनिवारी दि. ३१ मे ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे “करिअरच्या नव्या वाटा” असे दोन दिवसांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात विविध क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत विविध तज्ञ, वरिष्ठ अधिकारी स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

या मार्गदर्शन सत्रात, शनिवारी दि. ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता “पत्रकारितेतील संधी” या विषयावर निवृत्त माहिती संचालक तथा न्यूज स्टोरी टुडे चे संपादक देवेंद्र भुजबळ हे मार्गदर्शन करणार आहेत.
या दोन दिवसांच्या मार्गदर्शन शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मुलामुलीनी तसेच पालकांनी वरील 👆 क्यू आर कोड स्कॅन करून / पुढील प्रमाणे नोंदणी करणे आवश्यक आहे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800