वसुंधरेने गे लपेटली
धुक्याची रम्य चादर
जाग पहाटेस आली
झोप डोळी अनावर… 1
सोनेरी येती कवडसे
तिरपी किरणे उन्हाची
आसमंते तांबूस दिसे
नेत्री सुखद पहाटेची… 2
तरुवेलीस येई बहर
सानंदे वृक्षे डोलती
अंकुरती तृण धरेवर
सौन्दर्ये नटली धरती… 3
झुळूक वाऱ्याची येता
तनुस झोंबतो गारवा
थंडीने काया शहारता
चित्ती येई उत्साह नवा… 4

— रचना : मीना घोडविंदे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

मीनाताई, सुंदर कविता