Sunday, June 1, 2025
Homeबातम्यानर्मदालय : सुसज्य संकुलाचे उद्घाटन

नर्मदालय : सुसज्य संकुलाचे उद्घाटन

मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील लेपा पुनर्वास येथे विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ रूरल टेक्नॉलॉजी या संस्थेच्या नव्या दोन मजली सुसज्ज संकुलाचे नुकतेच उद्घाटन झाले.

या संकुला साठी 1.2 कोटी खर्च आला असून यात प्रामुख्याने आदिवासी मुलामुलींसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू आहे.

संकुलाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य श्री भैय्याजी जोशी आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल रिलेशन्सचे संचालक राज्यसभा सदस्य श्री विनय सहस्रबुद्धे, पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ गिरीशराव  बापट उपस्थित होते.

श्रीमती भारती ठाकूर, डॉ गिरीशराव बापट, डॉ विनय सहस्त्रबुद्धे आणि श्री भय्याजी जोशी

आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांसाठी नर्मदालय (निमाड अभ्युदय रूरल मॅनेजमेंट एंड डेव्हलपमेंट असोसिएशन) या संस्थेने दोन वर्षांपूर्वी 12 आदिवासी  मुले आणि 2 मुलींसाठी ग्रामीण तंत्रज्ञान या विषयाचा शैक्षणिक उपक्रम सुरू केला. परंतु करोना मुळे त्यात खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही मुले आपापल्या घरी सुद्धा जाऊ शकत नव्हती. अशा वेळी संस्थेने या सर्व विद्यार्थ्यांची सर्व व्यवस्था नर्मदालयाच्या परिसरातच केली आणि शक्य तेवढे सर्व तांत्रिक अभ्यासक्रम हाती घेऊन पूर्ण केले. येत्या काही महिन्यात संकुलाचे उरलेले थोडे काम पूर्ण होईल असे  नर्मदालयाच्या संस्थापक विश्वस्त कार्यवाह सुश्री भारती ठाकूर यांनी याप्रसंगी सांगितले.

भोपाळ येथील सेंटर फॉर रिसर्च अँड इंडस्ट्रियल स्टाफ परफॉर्मन्स (CRISP) आणि पुणे जिल्ह्यातील पाबळ येथील विज्ञान आश्रम यांच्या सहकार्याने हे उपक्रम राबविण्यात येतील. नर्मदालयाचे उपाध्यक्ष श्री महेश दाबक यांनी या प्रकल्पाला चालना दिली आहे असेही सुश्री ठाकूर म्हणाल्या.

वेल्डिंग, प्लंबिंग, घरगुती वायरिंग आणि इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, टू व्हीलर सर्विसिंग, शेतीच्या अवजारांचे सर्विसिंग आणि दुरुस्ती,  सुतारकाम, गोशाळा व्यवसाय, शेती, बागकाम आणि रोप वाटिका  अशा नाविन्यपूर्ण विविध अभ्यासक्रमांचा पदविका अभ्यासक्रम हाती घेतला असून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर रोजगार उपलब्ध होऊ लागतील असा विश्वास सुश्री ठाकूर यांनी व्यक्त केला.

या संकुलाची उभारणी देणगीदार व्यक्ती आणि संस्था यांच्या आर्थिक सहकाराने करण्यात आली आहे. संकुलाची उभारणी पूर्ण होत आली असून ती थोड्या आर्थिक सहकार्याने पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चांगल्या उपक्रमाला समाजातील सर्व घटकांचे नेहमीच सहकार्य मिळत आलेले आहे असे त्यांनी नमूद केले.

या केंद्राचे संचलन श्री दिग्विजय सिंह चौहान आणि श्री शंकर केवट करीत आहेत.

या संकुलासाठी अर्थसहाय्य  देणाऱ्यांमध्ये सूर्या फौंडेशन, नवी दिल्ली (२० लाख),
इथर इंडस्ट्रीज, सुरत   (१० लाख ),
श्री रवींद्र देशपांडे, नासिक (१० लाख),
श्री द्वारकानाथ कुलकर्णी, पुणे (१० लाख)
यांचा समावेश आहे.

संस्थेच्या माहितीसाठी, सुश्री भारती ठाकुर यांचा ईमेल पत्ता पुढील प्रमाणे आहे – narmadalaya@gmail.com, www.narmadalaya.org

– टीम एनएसटी. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माधव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो !
Shashikant Oak on कथा : २
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on ‘स्नेहाची रेसिपी’ – १७
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनक्रम