अरे ! अरे ! नशिबा ! काय म्हणू तुला
पहिलाच राँग नंबर दिला
कारण सगळ्या परिक्षा देऊन
टेलिफोनचा काॕल आला !!
कुणी पहावा आॕपरेटर्सचा छळ
रात्र असो वा पहाटेची सकाळ
येती ठेवूनी घरी लहान बाळं !!
सोडूनी सर्व घर-विचार
सदा मुखी असे नमस्कार
शनिवार-रविवार, दिवाळी-दसरा
तिला नाही कोणतेच सणवार !!
काळ-वेळ नाही भोजनास
बंदी येथे रागावण्यास
बोलणं कोणाचेही
जरी भिडलं मनास !!
जरी नशिबी हॕलोss हॕलोss रोज
पण कामाची होती येथे वेगळीच मौज
तुझ्या विरहाने झुरतोय जीव
क्षणा-क्षणाला आठवतंय
एमटीएनएल आज !!
आॕफिसच्या धाकात, कामाच्या व्यापात आम्ही
नम्रता आणि धडे शिस्तीचे शिकलो आॕपरेटर
मैत्रीणींच्या सुख-दुःखात, संसाराच्या रहाटगाडग्यात
कळलंच नाही आम्ही सारे
कधी झालो रिटायर !!
एमटीएनएलने मायबाप
होऊनी सांभाळ केला
बळ दिले जगायला, स्वप्ने साकारायला
जन्मोजन्मी ञृणी राहीन टेलिफोनला
लाख-लाख धन्यवाद देते
आज मी माझ्या नशिबाला !!
– रचना : सुरेखा गावंडे
सुरेखा..तेव्हा वाटला हा राॅगं नंबर पण आयुष्यात तोच होता तो करेक्ट नंबर…मस्त वास्तविक कविता..मनाला भिडणारी सुदंर सुरेख नावाप्रमाणेच.
तुमच्या कार्यालयातील विश्वाचे दर्शन घडवले..
खूप खूप छान आहे…
वा सुरेखा ताई छान कविता
अगदी तक्रारी बरोबर
भावनिक गुंतवणूक किती छान होती
हेच जास्त मनाला भावले