Homeबातम्यानागपूर :“क्रॉस टॉक” सीएमईचे यशस्वी आयोजन

नागपूर :“क्रॉस टॉक” सीएमईचे यशस्वी आयोजन

नागपूर, दि. १८ जून २०२६ : डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया (डीएआय), नागपूर शाखेच्या वतीने नुकतेच नागपूर “क्रॉस टॉक” या शैक्षणिक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या “सतत वैद्यकीय शिक्षण” (सीएमई) कार्यक्रमात मधुमेहतज्ज्ञ, फिजिशियन, अंतःस्रावतज्ज्ञ तसेच इतर वैद्यकीय व्यावसायिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाची सुरुवात डीएआय नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. नितीन वडस्कर यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. वैज्ञानिक सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. शंकर खोब्रागडे, डॉ. प्रशांत गोवर्धन आणि डॉ. संदीप खारकर यांनी भूषविले.

“भारतीय सण-उत्सवांच्या काळातील मधुमेहातील रक्तशर्करेतील चढ-उतार” या विषयावर पहिले व्याख्यान डॉ. केतकी अंबुलकर यांनी दिले. सण-उत्सवांच्या काळात रक्तातील साखरेत होणारे चढ-उतार, सतत ग्लुकोज मोजणी प्रणाली (सीजीएम) चे महत्त्व, सणपूर्व समुपदेशन तसेच रुग्णानुसार औषधोपचारांमध्ये आवश्यक बदल याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सणांपासून दूर राहणे नव्हे, तर सुरक्षितपणे त्यात सहभागी होणे हेच खरे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

“प्रौढांमधील मधुमेह आणि हृदयविकाराची लक्षणे” या विषयावर दुसरे व्याख्यान डॉ. अझीझ खान यांनी दिले . मधुमेह आणि हृदयविकार यांच्यातील निकटचा संबंध स्पष्ट करताना त्यांनी मधुमेहामुळे हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या वाढत असल्याचे सांगितले. आधुनिक सल्फोनिलयुरिया औषधे, विशेषतः ग्लिमेपिराइड, यांची हृदयविकाराच्या दृष्टीने सुरक्षितता तसेच विविध आंतरराष्ट्रीय संशोधनांतील निष्कर्ष त्यांनी उपस्थितांसमोर मांडले.
दोन्ही व्याख्यानांनंतर उपस्थित डॉक्टरांनी उत्स्फूर्तपणे चर्चेत सहभाग घेतला. तज्ज्ञांनी उपस्थितांच्या विविध शंकांचे समाधानकारक निरसन केले.

कार्यक्रमाचा समारोप डीएआय नागपूर शाखेच्या संयुक्त सचिव डॉ. योशिता पेंढारकर तलमले यांनी केला.

यावेळी डॉ. विवेक भालेराव, डॉ. अभिषेक खोबरागडे, डॉ. योशिता पेंढारकर तलमले, डॉ. पियुष खेरडे, डॉ. आर. बी. कलमकर, डॉ. सुधीर मंगरुळकर, डॉ. सुधीर कमलाकर, डॉ. पवन मानेटकर यांच्यासह डीएआय नागपूर शाखेचे अनेक सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. यामुळे उपस्थित वैद्यकीय तज्ज्ञांना परस्पर संवाद, अनुभवांची देवाणघेवाण आणि व्यावसायिक संबंध दृढ करण्याची संधी मिळाली.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments