Homeबातम्यानागपूर : रोटरी क्लबतर्फे सायकल वाटप.

नागपूर : रोटरी क्लबतर्फे सायकल वाटप.

रोटरी क्लब होरायझन नागपूर तर्फे वर्धा जिल्ह्यातील हिंगणी येथील यशवंत विद्यालयात सायकल वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉ. सुधीर मंगरुळकर यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाणे येणे लवकर व्हावे ह्या उद्देशाने आम्ही दरवर्षी सायकल वाटप करत असतो”

क्लबच्या सदस्य सौ. शिल्पा धर्माधिकारी यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, “आम्ही ज्या सायकल वाटप केल्या आहेत त्या किमान 5 वर्षे व्यवस्थित वापरून, चांगले शिक्षण घेवून शाळेचे व गावाचे नाव उज्वल करा.”

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळेचे मुख्याध्यापक श्री. ठाकरे सर यांनी आपल्या मनोगतातून रोटरी क्लब होरायझन यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून ग्रामीण भागातील वर्ग ५ ते १० च्या विद्यार्थ्यांना 20 सायकल दिल्या आहे तेव्हा आमच्या शाळेतील विद्यार्थी यांना शाळेत येताना जो आनंद होईल तेव्हा ते आपले उपकार कधीही विसरणार नाही. शाळेत येताना त्यांचा जो वेळ वाचेल तो अभ्यास करण्यासाठी मिळेल असे सांगून त्यांनी रोटरी क्लब नागपूर होरायझन आभार मानले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. नरेंद्र ढवळे यांनी केले. आभार प्रदर्शन जेष्ठ शिक्षक श्री अनिल लोहकरे यांनी केले.

या कार्यक्रमाला वर्ग ५ ते १० चे लाभार्थी विद्यार्थी व पालक, शाळेतील शिक्षक, कर्मचारी, गावातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments