दररोज न चुकता करावे लागते, लक्षात ठेऊन,
नाही केले तर, संपर्क तुटतो, आपला जगाशी,
तसे आपले जग, अगदी आवाक्यातील, छोटेसे,
आपले सारे विचार विश्व या जगाच्या परिघाशी,
फार जुने आणि टिकाऊ आहेत हे ऋणानुबंध,
काही रक्ताचे, मैत्रीचे, जिव्हाळ्याचे, प्रेमाचे संबंध,
खूप काळजी घेतो आम्ही, त्यांना मनापासून जपतो,
आमचे सुख, दुःख यात, यांना भागीदार करतो,
नवी नाती जमवणे, यात खरेच ऊर्जा असते,
नवे विचार समजून घेणे, हेच आव्हान असते,
संबंधातले महत्व कळले तर नाती सतत रिचार्ज होतात,
वेळ कोणतीही येवो, सारे जवळ असतात…..

— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
