सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या हुंडाविरोधी चळवळीतर्फे राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या लेखन क्षमतेवर, विचार शक्तीवर, आकलन क्षमतेवर झालेला परिणाम पाहून पालक आणि शिक्षकांची चिंता वाढली आहे, तसेच भाषा विषयात विद्यार्थी मागे पडत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आलेले असतांना या निबंध स्पर्धेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाला बघून वेगळाच निष्कर्ष निघत आहे.
विशेष बाब ही की गेल्या ३३ वर्षांपासूनच्या या उपक्रमात लॉकडाऊन मुळे खंड पडला नाही. निबंधाचे विषय होते….
(१) कोविड -१९ महामारीने काय शिकवले ?
(२) सोशल मीडिया शाप की वरदान
(३) २१ व्या शतकात धर्माचे स्थान.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी, हिंदी, आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये २२८ महाविद्यालयांतून ८४३ निबंध स्पर्धेत दाखल झाले. पहिल्या विषयावर ९२ महाविद्यालयांतून ४०४ निबंध, दुसऱ्या विषयावर ८७ महाविद्यालयांतून ३३९ आणि तिसऱ्या विषयावर ४९ महाविद्यालयांतून १०० असे एकूण ८४३ निबंध असा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच दर्शवतो की युवा पिढीची लेखन क्षमता अबाधित असून युवकांची सकारात्मक विचार शक्ती समाजाला आणि पर्यायाने देशाला उज्वल भविष्य देण्यासाठी सक्षम आहे.
तीनही विषयात प्रथम तीन क्रमांकांच्या निबंधाना रोख पारितोषिके जाहीर झाली आहेत. पहिल्या विषयात प्रथम पारितोषिक विभागून नाशिकच्या के.के.वाघ शेतकी अभियांत्रिकी महाविद्यालयाची सई जाधव आणि वाशिमच्या पुंडलिकराव गवळी महाविद्यालयाची वैष्णवी गाभणे या दोघींना,
द्वितीय पारितोषिक विभागून सोलापूरच्या गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयाची रसिका येळवटकर आणि नाशिकच्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे दंत चिकित्सा महाविद्यालयाची प्रितिजा सुरवसे या दोघींना तर..
तृतीय पारितोषिक नाशिकच्या के.के.वाघ शेतकी अभियांत्रिकी महाविद्यालयाची अंजली केवटे यांना जाहीर झाले.
दुसऱ्या विषयात प्रथम रोख पारितोषिक रु. १५००/- आणि सर्वोत्कृष्ठ निबंधासाठी महाविद्यालयाला ट्रॉफी शहादा – नंदुरबार येथील के.व्ही.पटेल शेतकी महाविद्यालयाच्या स्मितल देवरेने पटकावली.
द्वितीय पारितोषिक विभागून लातूर येथील संगणकशास्त्र महाविद्यालयाची किरण कडगंची आणि येवला येथील स्वामी मुक्तानंद महाविद्यालयाची सिद्धी शेजपुरे या दोघींना.
तर तृतीय पारितोषिक धुळे येथील शेतकी महाविद्यालयाच्या भाग्यश्री पाटील यांना जाहीर झाले.
तिसऱ्या विषयात प्रथम पारितोषिक विभागून नाशिक येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे महाविद्यालयाची साक्षी पाटील आणि नागपूर इंस्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि च्या रितिक बलवीर यांना,
द्वितीय पारितोषिक विभागून शेतकी महाविद्यालय पुणे येथील अपूर्वा वामन आणि चिंचवड येथील लोकमान्य होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या राधाकृष्ण व्हनमाने यांना.
तर तृतीय पारितोषिक सोलापूर येथील श्रीराम उद्यानविद्या महाविद्यालयाच्या सायली देशमुख यांना जाहीर झाले.
एकूण चौदा रोख पारितोषिके आणि चाळीस प्रशस्तीपत्रे देण्यात येत आहेत. तीन विषयाचे परीक्षण अनुक्रमे डॉ. कविता रेगे, श्री देवेंद्र भुजबळ आणि श्री अनिल गोखले यांनी केले तर अंतिम सर्वोत्कृष्ठ निबंधाची निवड ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती माधवी कुंटे यांनी केली. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. असे संस्थेतर्फे कळविण्यात येत आहे.

– लेखन : आशा कुलकर्णी.
महासचिव – हुंडाविरोधी चळवळ, मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
खूपच छान…!
… प्रशांत थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
9921447007
👌 congratulations🥳🎉
अभिनंदन 🌹👌🌹🌹