निसर्गोपचार आश्रम आणि न्यूज स्टोरी टुडे यांच्या संयुक्त विद्यमाने उरळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमात नुकतेच विशेष शिबिर छान पार पडले. या शिबिरात सहभागी झालेल्या साधकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे. या सर्वांचे आणि विशेषत: निसर्गोपचार आश्रमाचे मनःपूर्वक आभार.
१
पहाटे पहाटे मला जाग आली..!!
गेले आठ दिवस निसर्गोपचार आश्रम उरळी कांचन येथील शिबिर म्हणजे पर्वणीच होती.
शिस्तीचे महत्व, खाणे पिणे, व्यायाम, योग साधना यांच्या कधीही वाटेला न जाणारा मी पुरता भांबावून गेलो होतो. पण शरीराची गरज म्हणून ते किती आवश्यक आहे याची जाणीव झाली.
पहिल्या दिवसा नंतर सर्व लाजच निघुन गेली त्यामूळे मसाज, स्टीम बाथ करतांना आपोआप स्वतः ला झोकून दिले गेले आणि प्रत्येक दिवसानंतर प्रत्येक क्षण आणि आपले शरीर किती महत्त्वाचे आहे याची जाणीव होत गेली. कधीही न खाल्लेले पदार्थ ही आपलेसे होवून गेले आणि त्यामुळे माझे ब्लड प्रेशर १५० होते ते चक्क ११० वर खाली आले, जे माझ्या शरीरास अत्यावश्यक होते आणि वजन ही किलोभर कमी झाले. प्रत्येकाने ह्या निसर्गोपचार पद्धती चा अनुभव घ्यावा असेच ते आहे. डॉक्टर अभिषेक याना बोलताना सांगितले सुध्दा मी अगदी तृप्त आणि समाधानी आहे.
आता या देहाचा मुख्यमंत्री मी आहे. किती वर्षे टिकायचे ते सर्वस्वी माझ्यावर अवलंबून आहे आणि पुढील वाटचालीसाठी एक महिन्याची आयुर्वेदिक औषध ही घेवुन आलोय. अतिशय सुरेख पद्धतीने साऱ्या शिबिराचे आयोजन देवेंद्र आणि सौ. अलका यांनी बैजवार केल्यामुळे नकळत सारे घडले जे आवश्यक होते..
एकाच शब्दात सांगायचे म्हणजे अगदीं अप्रतीम 🌹
— गप्पागोष्टी फेम जयंत ओक.
२
निसर्गोपचार आश्रम – ऊरळीकांचन, येथील ८ दिवसांच्या शिबिराचा अनुभव खूपच छान होता.
आपण आजपर्यंत कसे वेडेवाकडे खात होतो आणि काय व कसे खायचे, खायच्या वेळा, व्यायाम, योग, मसाज… असे बरेच काही. याबद्दल आधीपण ऐकले होते पण स्वतः घेतलेला अनुभव व त्याचा फायदा प्रत्यक्ष मिळाला.
वजन ३ किलो व पोट ३ इंच कमी झाले.
हालचालीत खूपच सहजता आली.
न्यूज स्टोरी टुडे आयोजित या शिबिराबद्दल सौ अलका व
श्री देवेंद्र भुजबळ यांचे खूप आभार.
— श्रीकांत सिन्नरकर. पुणे
३
मलाही खूप छान अनुभव आला. गुडघेदुखीने चालताना खूप दुखायचे. त्यामुळे हळूहळू चालावे लागत असे. आता छान मालिश, काढे, रस, तेल विरहित भाज्या, योगा इत्यादीं सर्व क्रमाक्रमाने करवून घेतले गेले. त्याचा खूप चांगला परिणाम माझ्या एकंदर पूर्ण शरीरावर झाला.
माझ्या मुलीने घरी आल्या क्षणी चीअर्स केले आणि म्हणाली, मम्मी तू किती फ्रेश दिसते आहे ! आणि आता सहजपणे चालते आहेस. मला स्वतःला सुध्दा आत्मविश्वास आला. त्यामुळे श्री व सौ भुजबळ यांचे खूप खूप आभार, कारण त्यांच्या मुळे हे शक्य झाले.
— श्रध्दा थडाणी. चेंबूर, मुंबई
४
निसर्गोपचार केंद्रातील सात दिवस उत्तम, मार्गदर्शक होते. स्वतःचे वाढलेले वजन नियंत्रित करण्यासाठी कोणता आहार घ्यावा, असलेल्या आजारांवर योगासनांबरोबर इतर उपचार करून कसं नियंत्रण ठेवायचं. ह्या सगळ्या गोष्टी छान होत्या.
धन्यवाद अलकाताई आणि देवेंद्र सर🙏
— सौ मेधा सिन्नरकर. पुणे
५
खूप छान, अप्रतिम कार्यक्रम झाला. सर्वांच्या सहकार्याने खूप आनंद मिळाला.
श्री देवेंद्र भुजबळ त्याचप्रमाणे त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अलका भुजबळ यांच्या अथक परिश्रमाने कार्यक्रमाला वेळोवेळी शोभा आली.
डॉक्टर देवीकर त्याचप्रमाणे तेथील सर्व स्टाफ आणि कर्मचारी सर्वांनी आवश्यक ते सहकार्य दिले. माझ्यासारख्या पामराला एक वेगळाच अनुभव आला. असे संमेलन पुन्हा पुन्हा व्हावे, सर्वांनी पुन्हा एकत्रित यावे अशी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार धन्यवाद, तसेच सर्वांचे अभिनंदन !!
— कवी शांतीलाल ननावरे. बारामती
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800