विश्वभरारी फौंडेशन आणि नॅशनल लायब्ररी, वांद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, शनिवारी, 24 जानेवारी 2026 रोजी नॅशनल लायब्ररी च्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनात “न्यूज स्टोरी टुडे” या आपल्या वेब पोर्टल ला सन्मानित करण्यात येणार आहे. हा सन्मान पोर्टलने मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, कला, लोक शिक्षण, वैचारिक लेखन या क्षेत्रात बजावलेल्या आणि बजावित असलेल्या कामगिरीबद्दल प्रदान करण्यात येणार आहे.
या संमेलनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री श्री आशिष शेलार यांच्याहस्ते होणार आहे. तर स्वागताध्यक्ष आमदार पराग गुळवणी हे असून अध्यक्षपद प्रसिद्ध लेखक श्री किरण येले हे भूषविणार आहेत. या संमेलनात विविध परिसंवाद, कवी संमेलनही होणार आहे.

पोर्टलचा अल्प परिचय :
या पोर्टल ला ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पोर्टल मुळेच 3 वर्षापूर्वी न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन सुरू झाले असून देश विदेशातील लेखक, लेखिकांची पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत.
तर 31 जुलै 2025 पासून सुरू करण्यात आलेल्या “@newsstorytoday1” यूट्यूब वाहिनीवर आतापर्यंत विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या प्रेरणादायी मुलाखती घेण्यात आल्या आहेत.
पोर्टलचे वैशिष्ट्य म्हणजे पोर्टलवर दैनंदिन राजकारण, गुन्हेगारी, बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला जात नाही. तर मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, कला, आरोग्य, पर्यटन, सेवा, उद्योजकता विकास, यशकथा लोक शिक्षण, वैचारिक लेखन, कविता, अनुभव असेच साहित्य प्रसिद्ध करण्यात येत असते.
आतापर्यंत या पोर्टल ला, पोर्टलचे संपादक; निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांना, निर्मात्या सौ अलका भुजबळ यांना पुढील पुरस्कार मिळाले आहेत.
१) जनमत चाचणी घेऊन अप्रतिम मीडिया संस्थेतर्फे देण्यात येणारा विकास पत्रकारितेतील अत्यंत मानाचा असा राज्यस्तरीय “चौथास्तंभ पुरस्कार” तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते एका शानदार सोहळ्यात पत्रकार दिनी, ६ जानेवारी २०२३ रोज यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉइंट, मुंबई येथे एका भव्य समारंभात प्रदान करण्यात आला.

२) पोर्टलचे सांस्कृतिक योगदान लक्षात घेऊन “एकता पुरस्कार” ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्याहस्ते साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
३) नवी मुंबईतील मराठी साहित्य, संस्कृती, कला मंडळातर्फे मराठी भाषा दिनी, २७ फेब्रुवारी २०२३ रोजी “विशेष सन्मान” करण्यात आला.
४) पोर्टल च्या निर्मात्या म्हणून सौ. अलका भुजबळ यांना “सावित्रीबाई फुले पुरस्कार“, ठाणे येथे गडकरी रंगायतन मध्ये ८ जानेवारी २०२३ रोजी प्रदान करण्यात आला.
५) पोर्टल चे सामाजिक योगदान म्हणून “माणुसकी सेवा गौरव पुरस्कार” २५ फेब्रुवारी २०२३ रोजी नाशिक येथे प्रदान करण्यात आला.
६) पोर्टलचे साहित्यिक योगदान लक्षात घेऊन मुंबईत “सर्वद पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
७) विश्व बंधुत्वासाठी पोर्टल करीत असलेले कार्य पाहून रोटरी क्लब इंटरनॅशनल तर्फे विशेष पुरस्कार.
८) लोकनेते, माजी खासदार, श्री रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते देवेंद्र भुजबळ यांना माध्यमभूषण पुरस्कार २६.१०.२०२५ रोजी प्रदान
९) पोर्टल च्या निर्मात्या म्हणून सौ अलका भुजबळ यांना रेडिओ, टीव्ही विश्वात ला “रापा पुरस्कार“
१o) साहित्य, संस्कृती आणि संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नवी मुंबई शाखेतर्फे विशेष सन्मान.
असे हे अनोखे पोर्टल आफ्टरनून, फ्री प्रेस जर्नल, डी एन ए (झी मीडिया), एशिएन एज (डेक्कन क्रोनिकल) या मुंबईतील प्रतिष्ठित इंग्रजी वर्तमान पत्रांमध्ये व काही काळ टिव्ही 9, मिड डे मध्ये आणि आता फ्री प्रेस जर्नल या वृत्तपत्रात प्रिन्सिपल करस्पॉडंट असलेल्या देवश्री भुजबळ हिने कोरोनाच्या भयंकर काळात लोकांना धीर मिळावा, दिलासा मिळावा, योग्य माहिती मिळावी या साठी काळाची पावले व डिजिटल पत्रकारितेचे महत्व ओळखून सुरू केले. यासाठी तिने या माध्यमाचे स्वतः प्रशिक्षण घेतले.

निवृत्त माहिती संचालक तथा माजी दूरदर्शन निर्माते, माजी पत्रकार देवेंद्र भुजबळ हे या पोर्टलचे संपादन तर त्यांच्या सहचारिणी सौ अलका भुजबळ या वेबपोर्टलची निर्मिती करीत असतात.
“या वेबपोर्टलला मिळालेले व मिळत असलेले यश हे सर्व लेखक, कवी, वाचक आणि पोर्टलशी जोडल्या गेलेल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे जणू प्रतीकच आहे” असे म्हणणे योग्य ठरेल. सर्वांचे स्नेह, सहकार्य पुढेही मिळत राहील, असा विश्वास देवेंद्र भुजबळ व्यक्त करतात.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

पोर्टलची घोडदौड अभिमानास्पद आहे.