कोरोना आला, प्रादुर्भाव वाढला, रूग्णांची संख्या वाढली, आपल्या काही बांधवांना जीवही गमवावा लागला. अनेक जणांनी कोरोनावर मात करण्यासाठी आपली बौध्दीक व शारिरीक ताकद पणाला लावली. काही ठिकाणी व्यवसाय ठप्प झाले. गरिबांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
परंतु प्रशासकीय यंत्रणा व प्रशासकीय क्षेत्रातील सर्व कर्मचारी मात्र थांबले नाहीत. ते खबरदारी, जबाबदारीचे पालन करत आपले कर्तव्य निर्भिडपणे पार पाडत आहेत. आजही प्रशासकीय यंत्रणा प्रभावशालीपणे आपले काम करित आहे.
अशाच प्रशासकीय सेवेत असणारे ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी हे त्याच एकजुटीने कार्य करतांना दिसले आहेत. वेळोवेळी शासकीय योजना असोत, सध्याच्या घडामोडीत लसीकरणासंबंधी परिपुर्ण माहिती अहवाल अवगत करणे यासारखे कामकाज, बातम्यांचा आढावा व ठाणे जिल्हयातील पत्रकारांना संबंधित कोरोना जनजागृती माहिती विषयी देणे असे अनेक कार्य मोठया जोमाने करत आहेत.
याच जिल्हा माहिती कार्यालयात श्री नितीन पाटोळे, क्लार्क हे कोरोना प्रादुर्भावात करीत असलेल्या कार्याची प्रशंसा सर्व ठाणे जिल्हयात कौतुकास्पद ठरली आहे.
श्री पाटोळे यांनी विशेषतः ते दिव्यांग असतानाही घरून काम करण्याची सवलत न स्विकारता दररोज कार्यालयात येऊन आपले काम ते निर्भिडपणे करीत आहेत.
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ठाणे जिल्हयातील पत्रकारांच्या जाहिरात बिलाचे काम ते चोखपणे निभावत आहेत. कोरोना प्रादुर्भावात ज्या पत्रकारांची बिले प्रलंबित होती त्या बिलांचा पाठपुरावा करून, वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद, संपर्क, चर्चा करून सर्व पत्रकारांना थकीत बिले मिळवून देण्यात सहकार्य करत आहेत. त्यांनी एक प्रकारे माणूसकीची झरी जपली आहे.
नितीन पाटोळे हे कोरोनामध्ये कोठेही डगमगले नसुन त्यांनी निर्भिडपणे आपले काम केल्याने त्यांच्या कार्याची ठाणे जिल्हयातील सर्व पत्रकारांनी कौतुकाची प्रशंसा केली आहे.
वरिष्ठ अधिकारी यांचे आदेशाचे पालन करून आपली जबाबदारी सांभाळत असताना दुसरीकडे ठाणे जिल्हा माहिती कार्यालयात आलेल्या व्यक्तींना आदरपूर्वक सन्मान देऊन नितीन पाटोळे यांनी माणूसकी व नैतिकता जपली आहे. एकनिष्ठेने काम करून श्री.पाटोळे यांनी प्रशासकीय सेवेतून शासनावर विश्वास ठेवण्यास प्रत्येकाला प्रेरित करून देण्याचा सिंहाचा वाटा प्राप्त केला आहे. गेल्या ५ ते ६ वर्षात ज्या ज्या जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी पदभार स्विकारला त्यांनीही नितीन पाटोळे यांच्या कार्याची पाहून प्रशंसा केली असणारच यात शंका नाही.
अनेक वर्षापासून ठाणे जिल्हयातील पत्रकारांना थकीत बिल, चालू बिल मिळवून देण्यासाठी नितीन पाटोळे यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. श्री.पाटोळे यांनी नियोजनबध्द काम करून रितसर बिलाची मांडणी करून वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करून अनेक वृत्तपत्रांना त्यांची बिलं प्राप्तीसाठी प्रशंसनीय काम केले आहे. कौटूंबिक विचार बाजूला सारून काम एके काम जोपासणार्या नितीन पाटोळे यांच्यावर प्रशंसेचा वर्षाव करण्यात येत आहे.
वेळोवेळी जाहिरात संदर्भातील माहिती पत्रकारांपर्यंत पोहोचविण्यासाठी श्री.पाटोळे यांच्या नावाची चर्चा प्रथम केली जात आहे. नितीन पाटोळे हे निर्भिड व परखड भुमिकेचे जरी असले तरी त्यांचे कार्य माणूसकी जोडणारी ठरत आहे.
श्री.पाटोळे हे दिव्यांग व्यक्ती असताना कोरोना प्रादुर्भावात मोठया धाडसाने कार्यालयात हजर राहून आपले काम करतांना दिसत आहेत. अलीकडे दिव्यांग व्यक्तींना कोरोना प्रादुर्भाव असल्याने वर्क फ्रॉम होम असताना ठाणे जिल्हयाच्या विविध दैनिक, साप्ताहिक, मासिक वृत्तपत्राला माहिती, बिले प्राप्त करून देण्यासाठी या कोरोना प्रादुर्भावातही नितीन पाटोळे हे ठाणे जिल्हा माहिती कार्यालयात निडरपणे काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्या या कार्याचा खरं तर गौरव व्हायला हवा कारण ते दिव्यांग जरी असले तरी अनेकांच्या सेवेसी असताना वर्क फ्रॉर्म होम म्हणून सवलत न स्विकारता कार्यालयातच दररोज येऊन काम करण्याचा त्यांची नैतिकता टिकवणारा मानस अनेकांना भावून गेला आहे. पाटोळे यांना भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
– लेखन : पत्रकार, कुणाल शेलार.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.