Wednesday, March 11, 2026
Homeबातम्यापत्रकार संजय जाधव : हवेत मदतीचे हात

पत्रकार संजय जाधव : हवेत मदतीचे हात

कोल्हापूर येथील जेष्ठ पत्रकार श्री विजय चोरमारे ह्यांनी त्यांच्या फेसबुकवर केलेले आवाहन पुढे देत आहे. या आवाहनाला आपण सर्व नक्कीच प्रतिसाद देऊ या. श्री संजय जाधव यांना लवकर बरे होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
— संपादक

संजय जाधव हा माझा मुंबईतला पत्रकार मित्र. प्रहारमधला सहकारी. २००८ ते २०१२ अशी चार वर्षे आम्ही प्रहारमध्ये एकत्र काम केले. अत्यंत मुखदुर्बळ. सतत दबलेला असल्यासारखा. त्यानं कधी कुणाशी कधी वाद घातला नाही. किंवा त्याच्या चुकांसंदर्भात काही बोललं तर युक्तिवादही केला नाही. नेमून दिलेलं काम चोख करणारा पत्रकार. पत्रकारितेतल्या लोकांचे प्राधान्यक्रम ठरलेले असतात. म्हणजे मंत्रालय, महापालिका, एमएमआरडीए, क्राइम, हेल्थ, एज्यूकेशन इत्यादी. संजयला कधी असल्या लोकप्रिय बीट्सचं आकर्षण वाटलं नाही. तळागाळातले घटक हा त्याच्या आस्थेचा विषय. अशा विषयात रस असलेले एका हाताच्या बोटावर मोजता येणारे पत्रकार मुंबईत सापडणार नाही. संजय अशा दुर्मीळ पत्रकारांपैकी एक. झोपडपट्टीतल्या लोकांचे प्रश्न, असंघटित कामगारांचे प्रश्न, ज्यांच्याकडं कुणी ढुंकून बघत नाही अशा घटकांचे प्रश्न, त्यांचा आवाज तो सातत्याने मांडत होता.

मला एकदा लक्षात आलं की विधिमंडळ अधिवेशनाच्या काळातच नव्हे, तर वर्षभर आझाद मैदानावर काही ना काही सुरू असतं. राज्यातल्या कानाकोप-यातून लोक आपली गा-हाणी घेऊन येत असतात. एकटी-दुकटी माणसं असतात. संघटना असतात. त्यांचे प्रश्न सुटणं दूरच. मुंबईच्या या समुद्रात त्यांची कुणी दखलही घेत नसतं. ते कुणाच्या खिजगणतीतही नसतात. एकदा ठरवलं की, इथं आलेल्या प्रत्येक घटकाची आणि त्यांच्या समस्येची नोंद घ्यायची. त्यासाठी आझाद मैदान हे स्वतंत्र बीट निर्माण करून त्याची जबाबदारी संजय जाधवकडं दिली. २०१० ते २०१२ या दोन वर्षांत संजयनं रोजच्या रोज तिथं जाऊन तिथल्या आंदोलनांची दखल घेतली. प्रहारमध्ये त्यांच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. ही आपली जबाबदारी मानून संजयनं अत्यंत आस्थापूर्वक हे काम केलं. संजय जाधव होता म्हणूनच हे काम खंड न पडता होऊ शकलं.

तर असा हा संजय जाधव. आजच्या काळात दुर्मीळ म्हणता येईल असा पत्रकार. तळागाळातल्या घटकांचा प्रवक्ता. आज तो व्यक्तिगत आयुष्यात एका वेगळ्याच संकटाशी झुंजतोय. यकृताच्या कॅन्सरमुळं त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर मोठं संकट आलंय. उपचारासाठी एकूण चाळीस लाखUPI ID – रुपयांची गरज असून त्याच्या कुटुंबीयांनी त्यासाठी मदतीचं आवाहन केलं आहे. मी माझ्या परीनं शक्य ती मदत करतोय. पण तळागाळातल्या घटकांसाठी, समाजासाठी काम करणा-या एका जातिवंत पत्रकारासाठी शक्य त्या प्रत्येकानं मदत करावी, अशी विनंती मी या माध्यमातून करीत आहे. संजय यातून बरा होऊन लवकरात लवकर पुन्हा फिल्डवर यावा, या सदिच्छा!

मदत करण्यासाठीचा तपशील असा आहे….
Name – Sanjay Shankar Jadhav

*Account details –*
*Gpay no –* 9892221947
*UPI ID* – sanjay.jadhav781@oksbi
*Bank name* – State Bank of India
*IFSC* – SBIN0005087
*Account no* – 35839559115.

— लेखन : विजय चोरमारे. कोल्हापूर
— संपादन:देवेंद्र  भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments