केंद्र शासनाच्या “स्वच्छता हि सेवा” उपक्रमाच्या अनुषंगाने पांचगणी गिरीस्थान नगरपरिषदेच्या हिलदारी अभियानाअंतर्गत १७ सप्टेबर ते ०२ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात शहराच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सफाई मित्रांसाठी मौखिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात सर्व सफाई मित्रांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात येत असून आवश्यकता वाटल्यास पुढील उपचार मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

महाबळेश्वर येथे येणारे पर्यटक हमखास पाचगणी येथे येतात. त्यामुळे शहरात येणाऱ्या पर्यटकांमध्ये जनजागृती राबविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाच्या सुरुवातीला हिलदारीचे डॉ मुकेश कुळकर्णी यांनी विद्यार्थ्यांना उपक्रमाची माहिती व उद्देश याबाबत सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर दांडेघर टोल नाक्यावर हिलदारी टीम आणि विस्डम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज च्या विद्यार्थीनी टोल नाक्याच्या दोन्ही बाजूला आकर्षक फलकांच्या माध्यमातून स्वच्छ पाचगणी बाबत येणाऱ्या पर्यटकांमध्ये जनजागृती केली. या उपक्रमाला पर्यटकानी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला.

यानंतर टोल नाका ते सिडनी पॉईंट पर्यंत प्लकेथॉन राबवित जवळपास ६७ किलो सुका कचरा गोळा करण्यात आला.

या उपक्रमाला विस्डम चे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, न.पां. अधिकारी व कर्मचारी तसेच हिलदारी टीम चे असे एकूण ७२ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
याप्रमाणेच खिंगर रोड येथे मीनल बेहेन मेहता कॉलेज च्या राष्ट्रीय सेवा योजना एककासोबत स्वच्छता मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांसोबतच शहरातील विविध हॉटेलमधील. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, सफाई मित्रांसाठी विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण, पर्यावरण स्नेही गणेश उत्सवचा बक्षीस समारंभ, इतर उपक्रमात सहभाग घेतलेल्याचा सन्मान सोहळा सुद्धा आयोजित करण्यात येणार आहे.
सफाई मित्रांसाठीच्या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त सफाई कर्मचाऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी त्यांच्या नोंदणीसाठी न.पा व हिलदारी मार्फत पालिकेत विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
अभियानाच्या शेवटच्या दिवशी केंद्र शासनाच्या नमस्ते योजने अंतर्गत सफाई कर्मचाऱ्याच्या डिजिटल प्रोफाईल चे विमोचान व सफाई मित्राना शासकीय योजनाच्या कार्ड चे वितरण मा. मुख्याधिकारी श्री पंडित पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

या उपक्रमांसाठी पालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासक, श्री पंडित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून आरोग्य विभाग प्रमुख स्वाती पाटील, आरोग्य निरीक्षक सागर बडेकर, सहाय्यक आरोग्य निरीक्षक गणेश कासुर्डे, सुरेश मडके, शहर समन्वयक ओंकार ढोले, विस्डम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चे व्यवस्थापन समिती, प्राचार्य व श्री कळंबे सर यांचे सहकार्य लाभले असून सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी हिलदारीचे दीपक मदने, गणेश कासुर्डे, दिपाली धनावडे, प्राजक्ता बोडरे, अस्मिता कासुर्डे , शुभम भंडारी हे परिश्रम घेत आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800