पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद व नेस्ले प्रणित हिलदारी अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने सिडनी पॉईंट येथे पर्यावरणपूरक सार्वजनिक सुविधांची उभारणी करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत १५० किलोपेक्षा अधिक लो-वॅल्यू प्लास्टिकचा पुनर्वापर करून बेंच, पेविंग ब्लॉक तसेच सुरक्षेसाठी आवश्यक फेन्सिंग तयार करण्यात आली आहे.
यामध्ये दोन बेंच व १०० हून अधिक पेविंग ब्लॉकचा समावेश असून, टाकाऊ प्लास्टिकला उपयोगी स्वरूप देण्यात आले आहे.

या सुविधांमुळे सिडनी पॉईंटवर येणाऱ्या पर्यटकांना विश्रांतीसाठी सोय उपलब्ध झाली असून आकर्षक गॅलरी व सेल्फी पॉईंटमुळे पर्यटनस्थळाचा अनुभव अधिक चांगला होणार आहे.
या कामांचे लोकार्पण नगराध्यक्ष श्री. दिलीप बगाडे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

हिलदारी संस्थेच्या वतीने डॉ. मुकेश कुळकर्णी यांनी या उपक्रमामागील पर्यावरणीय संकल्पना स्पष्ट केली.
स्वच्छता, शाश्वत पर्यटन व पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले .
कार्यक्रमास नगरसेवक, पर्यावरण प्रेमी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️+91 9869484800
