खेळाडूंच्या उत्कर्षांचा विचार करून “एसॲॅली” यांनी अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने औंध, पुणे येथील पिकल बॉल खेळाचे कोर्टस् बनविले आहे. परदेशाबरोबर भारतातही आता हा खेळ लोकप्रिय होत आहे.
या अद्यावत क्रीडांगणाचे उद्घाटन सोलारीस क्लब, पुणेचे संचालक जयंतराव पवार यांच्याहस्ते दिप प्रज्वलन करून तर इंजि. कु. देवयानी राहुल पवार यांच्या हस्ते फित कापून नुकतेच करण्यात आले. क्रीडांगणाची पुजा करून हे क्रीडागण खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात आले.

या पिकल बॉल क्रीडांगणाची निर्मिती इंजि. राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. पुनम पवार, इंजि. कु. देवयानी पवार व मूळ अहिल्यानगर येथील पण आता पुणे येथे स्थायिक असलेला आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू यश शाह यांच्या प्रयत्नातून झाली आहे. या अगोदर विमाननगर, पुणे येथे देखील एस ॲली यांनी म्हाडा कॉलनी येथे अशाच कोर्टस् ची निर्मिती यशने केली आहे.

हे तीन कोर्टस् अद्यावत, तांत्रिक, शास्त्रशुध्द पध्दतीने बनविलेली असून खेळाडुंना खेळताना ईजा होण्यापासुन वाचवतील. हे कोर्ट्स आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून आकर्षक रंगसंगती, खेळती हवा, सुंदर बैठक व्यवस्था असुन खेळाडूंसाठी विश्रांती, कॅफे या सर्व सोयी-सुविधायुक्त असून खेळाडूंच्या पसंतीस निश्चितच उतरतील. सर्व सेवा – सुविधाजन्य पुरक असून खेळाडूंच्या उच्च प्रगतीसाठी भविष्यात उच्च दर्जाचे असे कौर्ट्स मानबिंदु ठरतील अशी आशा जयंतराव पवार यांनी व्यक्त करून या पिकल बॉल क्रिडांगणाचा खेळाडुंनी फायदा घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी इंजि. देवयानी पवार बोलताना म्हणाल्या, १९६५ मध्ये वॉशिंग्टन येथे बीलबेन, मॅकलबिन, जो पिचर्ड या ३ मित्रांनी या खेळाचा शोध लावला असून आंतर व बाह्य अशा क्रिडांगणात हा खेळ खेळता येतो. या खेळामुळे सर्वांचा सुंदर व्यायाम होत असल्याने लहान मोठे खेळाडु हा खेळ खेळुन आनंद घेऊ शकतात. विमाननगर व औंध येथील या नवनिर्मित कोर्टसवर आंतरराष्ट्रीय पातळीच्या स्पर्धा देखील घेता येतील, असे सांगुन त्यांनी शुभेच्छा दिल्या. इंजि. राहुल पवार यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

या कोर्ट्सच्या शुभारंभा प्रसंगी आंतरराष्ट्रिय किर्तीचे फिटनेस कोच मिहीर तेरणीकर, राजाजी पवार, राहुल पवार, सौ.पूनम पवार, मयुरी शाह. जय पवार व खेळाडु मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800