ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य श्री.अशोक चिटणीस आणि डॉ. शुभा चिटणीस यांच्या लेखणीतून उतरलेल्या “मंत्रमुग्धा’ (ग्रंथाली प्रकाशन), “हृदयस्थ’
(डिंपल पब्लिकेशन) “वेचित आलो सुगंध मातीचे’
(डिंपल पब्लिकेशन) “अद्वितीय’ (डिंपल पब्लिकेशन) अशा चार पुस्तकांचे दिमाखदार प्रकाशन नुकतेच सहयोग मंदिराच्या सभागृहात वाचक रसिकांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
यानिमित्ताने एकाच व्यासपीठावर बसलेले चार प्रकाशक आणि तिथे व्यक्त होणारी कार्यकर्तुत्व गाजवणारी विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व, त्यांचा परिचय, त्यांचे डोंगराएवढे काम, त्यांचे मौलिक विचार ऐकून रसिक कृतार्थ झाले, धन्य झाले. मुग्धा चिटणीस हिच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून ठाण्याचे जिल्हाधिकारी मा. राजेश नार्वेकर उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, खासदार राजन विचारे, ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवळ, डॉ.तांबे, उद्योजिका श्रीमती आशाताई कुलकर्णी, ज्येष्ठ कवयित्री सिसिलिया कार्व्हालो, निवेदिका, लेखिका हर्षदा बोरकर यांचे समवेत प्रकाशक या नात्याने अशोक मुळे (डिंपल पब्लिकेशन), सुदेश हिंगलासपूरकर (ग्रंथाली), विवेक मेहेत्रे (उद्वेली प्रकाशन) आणि निलेश गायकवाड (व्यास क्रिएशन्स) हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते.
यानिमित्ताने नंदेश उमप, उदेश उमप, गणेश मतकरी, सुप्रिया विनोद, अनाहिता इराणी, नम्रता इराणी या लेखक, कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका धनश्री प्रधान दामले यांनी सुंदर केले. मान्यवरांच्या भाषणांनी कार्यक्रम उत्तरोत्तर बहरत गेला.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800