सहज सख्या प्रित माझी,
बहरली रानावना,
तूच माझा दिलबर,
अन मीच तुझी साजणा..॥धृ॥
तू रे माझ्या जिवाचा, मैतर हा देखणा,
मी तुझ्या प्रितीची, करते रे कामना,
घे जरा बघुन मला, मिटते मी लोचना,
तूच माझा..॥१॥
हात तुझा हातात, कवळले मला उरी,
देही उठे झंकार, झाले मी बावरी,
ओठांनी प्रितीची, केली अशी कामना,
तूच माझा..॥२॥

– सौ.अंजली माधव देशपांडे. नाशिक.
खूप छान कविता. सुंदर वर्णन
छान कविता
Beautiful writing. Keep it up Manglaatya.
कविता फारच छान
खुपच छान रचना, प्रेम ह्या भावनेचे समर्पक वर्णन केले आहे.
🌹खूप छान कविता. विशेष गावरान भाषेमुळे अधिक प्रभावशाली वाटते 🌹
अभिनंदन सौं अंजली देशपांडे
🌹🌹🌹
अशोक साबळे
Ex. Indian Navy
Excellent 👌