फु बाय फु फुगडी फू या गीता चे विडंबन पुढे सादर करीत आहे.हे लोकगीत आहे.त्यामुळे ते कुणी लिहिले आहे हे आपल्याला कळू शकत नाही. मात्र ते शाहीर विठ्ठल उमप यांनी त्यांच्या भरदार आवाजात गाऊन लोकप्रिय केले आहे. या गीताला मधुकर पाठक यांचे संगीत लाभले आहे. त्यांची क्षमा मागून विडंबन गीत पुढे सादर करीत आहे.
— संपादक
फु बाय फु फुगडी फू,
वृद्धांच्या गमती
ऐकतेस का तू ग
ऐकतेस का तू !
सासू सांगे सुनेला,
फॅशन तुझी भारी !
आमच्या वेळी पगारात
होई मारामारी !1!
सासरा म्हणे जावयाला,
करता छान मदत !
किचन मध्ये मदतीची,
नव्हती आम्हा आदत !2!
सासू सांगे सुनेला,
नशीब तुमचे मोठे!
शेती बंगला रेडी,
वर गायींचे गोठे !3!
सासरा म्हणे लेकीला,
सोड सासुरवाडी !
10 गुंठे जमीन देतो,
बांधुन तुज माडी !4!
पुत्र म्हणे पित्याला,
चिंता नका करू !
सोडूतो अमेरिका,
ईथेच जॉब धरू !5!
कन्या सांगे आईला,
घेईन जबाबदारी !
आई होवून करीन
सेवा तुमची सारी !6!
जावई कळवे सासर्यांना,
करू तीर्थ यात्रा !
हसत खेळत जपणे,
हीच संसाराची मात्रा !7!
फु बाय फु फुगडी फू, वृद्धांच्या गमती
ऐकतेस का तू ग ऐकतेस का तू !

— रचना : हास्यकवी गजाभाऊ लोखंडे. सानपाडा, नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
Chhan
Nice poam