Wednesday, October 15, 2025
Homeबातम्याबहुगुणी महू

बहुगुणी महू

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील मोहगांव येथे व परिसरात महू फुलांचा हंगाम सुरू असून, महूच्या झाडांना या वर्षीही मोठा बहार आला आहे.

साक्री तालुक्यातील पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात डोंगरदऱ्या ,कपाऱ्यात, डोंगरावर जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर महूची झाडे आहेत. ती सध्या फुलांनी बहरली आहेत. त्यामुळे महू फुलांचा सुगंध परिसरात दरवळू लागला आहे. महू फुलांच्या वेचणीतून आदिवासी बांधवांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.
या फुलांचा उपयोग केवळ दारू बनविण्यासाठीच होतो असे नाही तर, महू फुलांचे आयुर्वेदात फार महत्त्व आहे. महू फुलांचा भाजीसह खाद्यपदार्थ, आजारांवर उपचारासाठी औषध म्हणून उपयोग होतो. आजारपणात तोंडाला चव यावी, म्हणून उसळ खातात. खोकला, पोटदुखी, आजारावर महू फुले गुणकारी आहेत. भाकरीच्या पिठात सुकलेली महू फुले टाकून खाल्ल्यास शांत झोप येते. महू फुलांच्या सेवनाने खोकलाही नष्ट होतो.

महु च झाड
महू ची फुलं
महू ची फुलं

एप्रिल महिना सुरू असल्याने तापमानाने ४० डिग्री ओलांडली आहे. पहाटे महू फुलांची गळ होते. सकाळी जंगल परिसरातील झाडांखाली महूची फुले वेचणी करताना आदिवासी बांधव दिसून येत आहेत. महू फुलांच्या वेचणीतून अनेकांना रोजगार मिळाला आहे.

महूची झाडे दुहेरी उत्पादन देणारीं असून, झाडे फुले आणि फळे देते. फुले संपली की टोळमी लागते. नंतर ती पिकली की त्या फळातून बदामापेक्षा थोडी मोठी बी निघते व ती सुकवून तेल घाण्यात पिळून तेल काढून घेतात. पश्चिम पट्ट्यात मोहगाव, शेंदवड , चावडीपाडा, पिंपळपाडा,वडपाडा, केवडीपाडा,बारीपाडा, मोगरपाडा, मांजरी, वास, सिताडी, काळांबा, धसकल, चोरवड, मळगाव, खरगाव, पारसरी, चरणमाळ, नांदरखी, बसरावळ या गावांत फुले वेचली जातात व विक्रीही केली जाते.

– अक्षय कोठावदे, नाशिक.
संपादक :- देवेंद्र भुजबळ – 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप