Wednesday, March 12, 2025
Homeबातम्याबहुपेडी उपचारपद्धतीने व्यसनमुक्त व्हा !-- डॉ धरव शाह

बहुपेडी उपचारपद्धतीने व्यसनमुक्त व्हा !– डॉ धरव शाह

कोणतेही व्यसन हे औषध, समुपदेशन, नशा मुक्ती केंद्र तसेच मद्यपी अनामिक (AA) या चार बाबींची मदत घेऊन सुटू शकतं असा दिलासा मानसोपचार तज्ञ डॉक्टर धरव शाह यांनी दिला. अन्वय प्रतिष्ठान आणि स्त्री मुक्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यसनमुक्ती समुपदेशकांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

डॉक्टर धरव शाह यांनी यावेळी व्यसनमुक्त झाल्यानंतर पुन्हा व्यसन लागू नये यासाठी आवश्यक कौशल्ये आणि त्याचे व्यवस्थापन (Lapse Prevention Management) यावर भर दिला. Motivational Interviewing ही नवीन संकल्पना त्यांनी समजावून सांगितली. व्यसनींना नियमित जेवण, झोप, छंद, नवीन मित्र, व्यायाम, ध्यान याप्रकारे जीवनशैलीत बदल करून त्यांचे जीवन संतुलित कसे करता येईल हेही विषद त्यांनी व्यसनी व्यक्तीच्या कुटुंबाचं समुपदेशन हा अतिशय महत्त्वाचा भाग असून घरातल्या लोकांनी व्यसनी व्यक्तीशी कशा प्रकारे वागणूक असावी याबद्दल महत्वाच्या सूचना दिल्या.

डॉक्टर धरव शाह यांनी सत्राचे नेतृत्व करून समुपदेशन प्रचार, प्रसार करणाऱ्यांना प्रत्यक्ष संवाद, पीपीटी सादरीकरण आणि रोल प्ले द्वारे मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेचा मुख्य उद्देश समुपदेशकांच्या कौशल्यात वृद्धी करणे हा असा असला तरी समुपदेशन कौशल्यातील नवे आयाम डॉ शाह यांनी उघडून दाखवले. विशेष म्हणजे व्यसनमुक्ती कार्यात येणाऱ्या अडचणी, शंका यावर अतिशय सुंदर मार्गदर्शन केले.

सर्वश्री अनिल लाड, चंद्रकांत सर्वगोड यांच्या हस्ते सहभागी झालेल्या समुपदेशकांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात स्त्री मुक्ती संघटनेच्या प्रेरणा गीताने झाली. अन्वय व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ अजित मगदूम यांनी प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला. रश्मी कार्ले यांनी आभार मानले.

या कार्यशाळेत स्त्री मुक्ती संघटनेच्या वस्ती पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्या, समुपदेशक, अन्वयचे समुपदेशक, सपोर्ट व्यसनमुक्ती केंद्राचे कार्यकर्ते तसेच अन्य अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. देशात गतीने वाढणाऱ्या व्यसनाधीनतेला रोखण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रांनी कोणती उपचार पद्धती याविषयीचे मोलाचे मार्गदर्शन या क्षेत्रात अनेक वर्ष काम करणारे प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ धरव शाह यांनी नवी मुंबईतील स्वयंसेवकांना केले. हे सबंध समाजाला माहीत होणे आवश्यक आहे आपण याला प्रसिद्ध केली याबद्दल आपल्याला धन्यवाद!
    Healthy society for healthy Nation.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित
सौ.मिनल शशिकांत शिंदे, on चित्र भाषा संमेलन : अभिनव उपक्रम