Homeसाहित्यबालकाव्य

बालकाव्य

“बेडकाचे लग्न”

जंगल होते भले मोठे
प्राण्यांची भरली सभा
सभेत भाषण कोल्ह्याचे
आवाज गेला त्याचा नभा |१|

मैना कोकीळ चतुर
बेडकाने केली गुर गुर
अरे चला पळा लवकर
नदीला आला महापूर |२|

अरे हा डबक्यात फसला
त्याला सापडेना रस्ता
प्लास्टिकचा ढिग पाहून
बघा माझ्या लग्नाचा बस्ता |३|

सारे मिळून खूप हसले
बेडकाला लग्नाची घाई
माकडीनीने आणला शिधा
जेवन कोणी बनवायचे बाई |४|

सगळ्यांनी बनवले जेवण
आला तिकडून वाघोबा
सगळे फस्त करतो पाहत
पायाला डसला नागोबा |५|

वाघोबा पळाले जीव घेऊन
अंगत पंगत जमली छान
सगळ्यांनी खाल्ले पोटभर
म्हणाले शुभ मंगल सावधान |६|

शोभा कोठावदे

— रचना : सौ.शोभा कोठावदे. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments