Wednesday, January 22, 2025
Homeबातम्यामदन लाठी यांचा आदर्श उपक्रम

मदन लाठी यांचा आदर्श उपक्रम

सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथील श्री आनंद गाटे व त्यांच्या पत्नी सौ पूजा गाटे यांनी दहा वर्षापूर्वी पुणे येथे दिघी परिसरात मातृछाया बालकाश्रम सुरू केला आहे. येथे पहिली ते बारावीपर्यंतच्या अनाथ विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याचा उपक्रम सुरू आहे.

शासनाकडून प्रति विद्यार्थी रुपये 30 ते 40 प्रति अनुदान मिळते. पण बाकीचा खर्च जसे की, वसतिगृहाचे भाडे, या मुलांचा राहण्याचा, जेवणाचा, चहा नाश्त्याचा, शिक्षणाचा आणि कपडे ई. हे दांपत्य त्यांच्या परीने आणि येणाऱ्या मदतीतून करीत असते. या वसतिगृहात 30 विद्यार्थी आहेत.

जळगाव येथील जैन उद्योग समुहाचे संस्थापक आदरणीय कैलासवासी श्री भवरलाल जैन यांची पुण्यतिथी आणि माजी केंद्रीय मंत्री आदरणीय श्री शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते मदन रामनाथ लाठी यांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणून या संस्थेला धान्य रुपाने मदत केली . त्यात 25 किलो गहू, 25 किलो तांदूळ, दहा किलो पोहे, दहा किलो साखर, पाच किलो तूर डाळ आणि बिस्कीट आदींचा समावेश आहे.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना श्री लाठी म्हणाले की या वसतिगृहातील ही आजची मुले आपल्या देशाचे भविष्य आहेत. या वसतीगृहामुळे ते आपल्या पायावर उभे राहून पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल.

या अनाथ आश्रमातर्फे आदरणीय श्री शरद पवार साहेब शतायुषी होवो अशा शुभेच्छा देण्यात आल्यात.

याप्रसंगी या वसतिगृहाचे श्री आनंद गाटे, रांजणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री निलेश शेळके आदी मंडळी उपस्थित होती.

– टीम एनएसटी. 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. Sh Bhujabal Sir,
    Good evening,
    This Is a very nice and beautiful way to serve the society.
    Thanks & Regards

  2. श्री.मदन लाठी यांनी अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांसाठी
    गहू तांदूळ पोहे इत्यादी रुपात भेट देऊन समाजापुढे मोठा आदर्श ठेवला आहे.थोरा मोठ्यांची भेट घेणे.
    त्यांचा सन्मान करणे.त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे
    तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळांना, वसतिगृहांना
    अनाथालयांना मदत करणे अशा सेवा कार्यातून
    श्री.मदन लाठी यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचे
    फार मोठे समाज कार्य केले आहे.समाजसेवक मान.श्री.
    मदन लाठी यांना माझा मानाचा मुजरा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments