Tuesday, June 3, 2025
Homeबातम्यामराठी पक्षी विश्वकोश : आवाहन

मराठी पक्षी विश्वकोश : आवाहन

मराठी भाषेमध्ये पक्षांविषयी खुप सारी पुस्तके आज उपलब्ध आहेत. परंतू फार मोजक्या पुस्तकांमध्ये पक्षांविषयी सविस्तर माहिती दिल्याचे दिसून येते.

बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीने(BNHS) प्रकाशित केलेल्या यादीनुसार महाराष्ट्रात एकुण 577 प्रजातीचे पक्षी आढळून येतात. या यादीला प्रमाण मानून प्रत्येक पक्षाविषयी सविस्तर माहिती देणारा पक्षीविश्वकोश पक्षीप्रेमी तथा गोंदियाचे अप्पर जिल्हाधिकारी श्री राजेश खवले यांच्या संकल्पनेतुन मराठीतून तयार करण्यात येत आहे. हा विश्वकोश एकापेक्षा अधिक खंडामध्ये प्रकाशित केला जाईल.

श्री राजेश खवले, अप्पर जिल्हाधिकारी

पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील 577 पक्षांविषयी माहिती देणारे खंड प्रकाशित केले जातील. 577 पक्षांची माहिती एकूण तीन खंडांमध्ये प्रकाशित केल्या जाईल. पहिल्या खंडांमध्ये एकूण 217 पक्षांबाबत माहिती असणार आहे. पक्ष्यांच्या नावांची यादी यासह संलग्न करण्यात येत आहे.

दुस-या टप्प्यात भारतीय उपखंडात आढळणा-या पक्षी प्रजाती विषयी माहिती देणारे खंड प्रकाशित केले जातील.

तर तिस-या टप्पयामध्ये जगात आढळणा-या व खास वैशिष्टये असणा-या पक्षांविषयी परिपूर्ण माहिती देणारे खंड मराठी भाषेतून प्रकाशित केले जातील.

पक्षांवर प्रेम करणा-या, पक्षांचे छायाचित्र काढणा-या आणि मराठी भाषेत लिखाण करू शकणा-यांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी आपल्याकडील छायाचित्रे “मराठी पक्षी विश्वकोशात” प्रकाशित करण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत. ग्रंथामध्ये छायाचित्रे छापतांना त्याखाली छायाचित्रकाराचे नांव नमुद करण्यात येईल. यामुळे आपल्या छायाचित्रांना व्यापक प्रसिध्दी देखील मिळेल. तसेच प्रत्येक लेखाच्या शेवटी संबंधित लेखकाचे नाव व मोबाईल क्रमांक नमूद करण्यात येईल.

लेख लिहिणाऱ्याने विकिपीडियावरील नोंदीप्रमाणे मुद्देनिहाय आणि सर्वसमावेशक लेख लिहिणे अपेक्षित आहे.

नव्याने लिखाण करणाऱ्यांना मार्गदर्शन व्हावे म्हणून नमुना तत्त्वावर काही पक्षांबाबत तज्ञ मंडळीद्वारा लेख लिहून प्रसिद्ध केले जातील. त्यामुळे लेख कसा लिहावा ? याबाबत लेख लिहिणा-यांना दिशा प्राप्त होईल.

महाराष्ट्रमध्ये हजारो पक्षीप्रेमी आहेत. ज्यांना ज्या पक्षाविषयी लिहिता येणे शक्य आहे, त्यांनी त्या पक्षांविषयी लिहावे. 577 पक्षीप्रमींनी एकत्र येवून एकाने एका पक्षाविषयी लिहिले तरी महाराष्ट्रात आढळणा-या पक्षांबाबतचे खंड त्वरित आकाराला येवू शकतील. तथापि एक व्यक्ती एकापेक्षा अधिक पक्षांविषयी देखील लिहू शकेल. “मराठी पक्षी विश्वकोश” निर्माण करणे, ही कुण्या एका व्यक्तीच्या आवाक्यातील बाब नाही. त्याकरिता सामुहिक शक्तीची गरज आहे .

एकाच पक्षांबाबत अनेक लेखकांनी लिहू नये म्हणून कोणत्या पक्षावर लिखाण सुरू आहे व अद्याप लिखाण करण्यासाठी कोणते पक्षी बाकी आहेत याची यादी वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल.

“मराठी पक्षी विश्वकोश” निर्दोषरित्या आकाराला यावा याकरिता तज्ञ मंडळीचे संपादक मंडळ गठित करण्यात येणार आहे. संपादनकामी पुढे येण्याची ज्यांची तयारी आहे, त्यांनी आपली नावे कृपया कळवावीत.

आपली मायबोली मराठी आणि पक्षी यांच्यावरील निखळ आणि निस्पृह प्रेमापोटी हे काम हाती घेतलेले असून यामागे कोणताही व्यावसायिक दृष्टिकोन नाही. त्यामुळे छायाचित्रकार आणि लेख लिहिणारे लेखक यांना मानधन देण्याचे नियोजित नाही हे नम्रपणे नमूद करण्यात येत आहे.

“मराठी पक्षी विश्वकोश” निर्मितीला सुरूवात झालेली आहे. चला तर मग उचला आपली लेखणी आणि लिहायला सुरूवात करा !
आपण लिहिलेला लेख पाठवा.

आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर कृपया पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करा.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे, सदस्य,
“मराठी पक्षी विश्वकोश” निर्मिती मंडळ प्रकल्प
9890967003

प्रा डॉ नरेशचंद्र कठोळे

आपण सर्व पक्षीप्रेमी एकत्र येऊ या आणि मराठी भाषेमधून पक्षी विश्वकोश आकाराला आणण्याचे स्वप्न साकार करू या !
–  लेखन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. या संकल्पनेतून नक्कीच एक अप्रतिम व तेवढीच उपयुक्त “पक्षी विश्वकोश”रूपी कलाकृती जन्माला येईल यात तिळमात्र शंका नाही. त्याबरोबरच छायाचित्रकार व लेखकांना आपले कौशल्य दाखवायची संधीही मिळेल. देवेंद्रजींना ही संकल्पना मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. विश्राम (संजू) व शुभांगी कुलकर्णी, पुणे.

  2. देवेंद्र सरांच्या आवाहनातून एक आगळा वेगळा, पक्षीविश्वकोश समोर येणार, ह्याचा खूप आनंद होत आहे. छायाचित्रकार व लेखकांसाठी पक्षी प्रेमींसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम उदयास येईल. खूप शुभेच्छा!

  3. ‘मराठी पक्षी विश्वकोश आवाहन’ हा देवेंद्र भुजबळ यांचा लेख आवडला. आशय तर आहेच उत्तम परंतु पक्ष्यांच्या चित्रांमुळे आकर्षकही झाला आहे.
    प्रतिभा सराफ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ. सुनीता फडणीस on हेच विसरूनी जाई
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माधव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो !
Shashikant Oak on कथा : २
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on ‘स्नेहाची रेसिपी’ – १७
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनक्रम