Sunday, July 6, 2025
Homeबातम्यामहाबळेश्वर : अधिक सुंदर होणार !

महाबळेश्वर : अधिक सुंदर होणार !

युनिव्हर्सिडॅड लिब्रे डी बॅरनक्विला (बॅरनक्विला विद्यापीठ) येथे १ मार्च १९९२ रोजी ११ कामगारांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून कचरा वेचक आणि या व्यवसायाशी निगडित इतर कामगारांनी आपल्या कामाला मान्यता मिळावी यासाठी आपला लढा सुरु केला होता. त्यांच्या स्मरणार्थ १ मार्च हा जगभरात आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिन म्हणून साजरा केला जातो.

भारतामध्ये ४ दशलक्षाहून अधिक कचरा वेचक आहेत जे दरवर्षी ५.३१ दशलक्ष टन कचऱ्याच्या जवळपास २० टक्के कचऱ्याच्या पुनर्वापरात योगदान देतात. हे बिनपगारी आणि अनोळखी कर्मचारी आपल्या शहरांना कचरामुक्त राहण्यास आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यास मदत करतात.

हिलदारी अभियाना अंतर्गत स्त्री मुक्ती संघटना व रीसिटी हे घन कचरा व्यवस्थापनात काम करणा-यांचे जीवनमान सुधारावे, समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलावा, समाजात त्यांना एक स्थान असावे, कचरा वेचण्याचे काम करताना आरोग्य व सुरक्षिततेची काळजी घ्यावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

याच अनुषंगाने दि.०१ मार्च २०२२ रोजी जागतिक कचरा वेचक दिनानिमित्त कचरा वेचकांचे महत्त्व, भूमिका आणि संघर्ष अधोरेखित करून कौतुकाचे प्रतीक म्हणून महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद व नेस्ले प्रणीत हिलदारी अभियाना अंतर्गत महाबळेश्वर मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यात वेण्णा लेक येथे कचरा वेचकांना बोटिंग करविण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थित या कचरा वेचकांना सफाई मित्र चे ओळखपत्र देण्यात आले. या सर्व कचरावेचकांची केंद्र शासनाच्या ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यात आली असून त्यांना ई-श्रम कार्ड व हेल्थ आयडी चे वाटप सुद्धा करण्यात आले ज्यामुळे त्यांना केंद्र सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजना/कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येईल.

कचरा वेचकांना हॅन्डग्लोज, मास्क, बूट, सॅनिटायझर, हाय व्हिजिबिलिटी जॅकेट, टोपी इत्यादी सुरक्षा साहित्य प्रदान करण्यात आले. कचरा वेचक आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या आव्हाने आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी या कार्यक्रमाने एक व्यासपीठ म्हणून काम केले.

यावेळी पालिकेचे मुख्य लिपिक श्री आबाजी ढोबळे, महाबळेश्वर पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री अभिजित खुरासणे, श्री विलास काळे, श्री सचिन शिर्के, गिरीस्थान हॉटेल असोसिएशन चे सेक्रेटरी श्री धीरेन नागपाल व सिनियर मेंबर श्री योगेश बावळेकर उपस्थित होते.

आपल्या सामाजिक जाणि‍वेचे भान ठेवून महाबळेश्वर येथील हॉटेल नीता शांती विला येथे श्री अनिल सावला, श्री दत्तात्रय वाडकर व श्री संजय जांभळे यांच्यामार्फत सर्व कचरा वेचकांसाठी स्नेह भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व उपक्रमांमध्ये एकूण १४ कचरा वेचकांनी सहभाग घेतला.

यावेळी कचरा वेचक महिला सविता घाडगे म्हणाल्या की, महाबळेश्वर नगरपरिषद व हिलदारी यांनी आज आमच्या सन्मानाचा दिवस साजरा केला आहे. आमच्या आरोग्याची किंवा आमच्या सुरक्षिततेची काळजी आता पर्यंत कोणी घेतली नव्हती. समाजामध्ये एक दुर्लक्षित घटक म्हणून आमच्याकडे बघितले जाते पण आज खऱ्या अर्थाने समाजामध्ये सन्मानाचे स्थान त्यांनी आम्हाला मिळवून दिले आहे. आमच्यासाठी आरोग्य शिबीर देखील त्यांनी आयोजित केले होते. आजचा आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिवस आम्ही आनंदाने साजरा करू शकलो त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.

या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून मुख्य लिपिक श्री आबाजी ढोबळे, श्री रोहित आतवाडकर, वेण्णा लेक बोट क्लब चे श्री शरद मस्के, सचिन दिक्षित, वैभव साळुंखे, महाबळेश्वर पत्रकार संघ यांचे सहकार्य मिळाले.

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी हिलदारीचे डॉ.मुकेश कुलकर्णी, राम भोसले, सुजित पेंडभाजे, प्रतिमा बोडरे, अभिषेक जाधव, फैयाज वारुणकर, दुर्गेश जाधव, खाकसारली पटेल, गौरी चव्हाण, क्षितिजा जाधव, अमृता जाधव, आर्तिका मोरे यांनी परिश्रम घेतले.

– टीम एनएसटी. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments