Thursday, November 21, 2024
HomeUncategorized"महिला अधिकाऱ्यांची संघर्षगाथा" पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

“महिला अधिकाऱ्यांची संघर्षगाथा” पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जिद्दीने यशाला गवसणी घालणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या संघर्षमय जीवन प्रवासाचा आलेख असलेल्या , युवा साहित्यिक किरण सोनार यांनी लिहिलेल्या

महिला अधिकाऱ्यांची ‘संघर्षगाथा

या पुस्तकाचे नुकतेच नाशिक येथे प्रकाशन करण्यात आले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे छोटेखानी कार्यक्रमात हे प्रकाशन झाले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सावनाचे डॉ. शंकर बोराडे, कवियत्री अलका कुलकर्णी, साहित्यकणा मंचाचे संजय गोराडे , कवी राज शेळके, शिवाजीराव ठाकरे , लेखक राजेंद्र उगले, कवियत्री सुरेखा बोराडे, तनुजा मुळे, शुभांगी पाटील, भावना भालेराव, मनीषा पोतदार उपस्थित होते .

 

पुस्तक परिचय

या पुस्तकात आय ए एस अधिकारी नीला सत्यनारायण , लीना मेहंदळे, मनीषा म्हैसकर, अश्विनी भिडे , प्रेरणा देशभ्रतार, भाग्यश्री बानायत , रोहिणी भाजीभाकरे, प्रांजळ पाटील, आय पी एस अधिकारी तेजस्वी सातपुते , डॉ, विशाखा भदणे, स्मिता पाटील , महापालिका उपायुक्त संगिता धायगुडे आणि भाग्यश्री जाधव यांचा संघर्ष प्रवास मांडला आहे.

चार टप्पे

या पुस्तकाचे प्रकाशन चार टप्यात करण्यात आले . पहिल्या टप्यात वैशाली प्रकाशनच्या संचालिका वैशाली पोतदार आणि लेखक किरण सोनार यांच्या मातोश्री सौ सुनंदा सोनार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्यात “बेटी बचाव, बेटी पढाव’ संकल्पनेच्या माध्यमातून कुमारिकांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. उपस्थित कवियत्री यांच्या हस्ते तिसऱ्या आणि चंद्रमौली महिला मंडळाच्या महिलांच्या हस्ते चौथ्या टप्प्यात प्रकाशन करण्यात आले. यावेळी वैशाली प्रकाशनचे संचालक विलास पोतदार यांनी सांगितले की, लेखक किरण सोनार यांनी महिला अधिकाऱ्यांची ‘संघर्ष गाथा’ रोचक, प्रेरक आणि सुंदरपणे गुंफली आहे. आजच्या सळसळत्या रक्ताच्या युवतींनी भविष्य कसे घडवावे यासाठी हे पुस्तक दिशादर्शक आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवतींसोबतच युवकांनाही हा ग्रंथ मार्गदर्शक ठरणार आहे. लेखक किरण सोनार यांनी सांगितले की, संघर्षमय मार्गाने यशाला गवसणी घालणाऱ्या प्रेरणादायी महिलांची संघर्षगाथा आजच्या मुलींना आत्मबळ देणारी आहे. त्यातून निश्चितच काहीतरी शिकायला मिळेल आणि त्यांच्या समस्यांवर उत्तरही मिळणार आहे. यावेळी प्रा. शंकर बोराडे यांनी सांगितले की, साहित्यामध्ये आजच्या तरुण पिढीचे वास्तववादी आणि दमदार लेखन सुरु आहे. किरण सोनार हे त्यापैकीच एक आहेत.

 

श्रद्धांजली

कार्यक्रमाच्या प्रारंभी वनाधिपती विनायक दादा पाटील, कवी किशोर पाठक, कवियत्री शारदा गायकवाड, डॉ. रसिका जाधव ,कवी रा. ना. थोरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. *कवी संमेलन* यावेळी स्त्री शक्ती आणि महिलांवर कविता सादर करण्यात आल्या. कवी राज शेळके, शिवाजीराव ठाकरे , राजेंद्र उगले, अलका कुलकर्णी, संजय गोराडे

तनुजा मुळे, शुभांगी पाटील आणि भावना भालेराव यांनी कविता सादर करीत मैफिल सजवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी रवींद्र मालुंजकर यांनी केले तर स्वागत प्रतिभा सोनार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय आकाश तोटे, अश्विनी भालेराव , पलाश तांदळे यांनी करून दिला. तर आभार प्रदर्शन उर्मिला पाचपुते यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चंद्रमौली महिला मंडळ, कादवा शिवार, अखिल भारतीय प्रकाशक संघ,नाशिक शाखा,नाशिक कवी,नाशिक कथालेखक,सूर्योदय साहित्य मंडळ,नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक संघ,युवा वक्ता संघ आणि कुसुमाग्रज साहित्य मंच,नाशिक आदींना परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. ‘महिला अधिकाऱ्यांच्या संघर्ष गाथा’ ह्या संग्रहाचे मनःपूर्वक स्वागत! प्रत्येकाला जीवनात संघर्ष करावा लागतो, धडपड करावी लागते. त्यातच नोकरी करणाऱ्या महिलांंचा संघर्ष वेगळाच असतो. त्यामुळे ह्या सर्व महिलांचे अनुभव प्रेरणादायी, अनुकरणीय ठरतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments