बाबा विठ्ठल श्रीहरी
माय माहेर पंढरी ।
बाबा काळजाची माया
माय ममतेची काया ।
बाबा निश्चयाचा घडा
माय वात्सल्याचा सडा ।
येता संकटाचा घाला
बाप उभा झेलायला ।
बाबा कर्तव्य सागर
माय ममता पाखर ।
माय बाप भावनात
माझ्या ओल्या काळजात ।
जन्मोजन्मी दे इश्वरा
माय बाबांचा सहारा ।
हेचि मागते रे देवा
मायबाप सुखी ठेवा ।

— रचना : सुजाता संजय येवले. नाशिकरोड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ.☎️ 9869484800.

Nice
🙏🙏