मुंबईतील डबेवाले त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे जगप्रसिद्ध आहेत. पण कोरोनामुळे उदभवलेल्या परिस्थितीमुळे सध्या तेही खूप अडचणीत सापडले आहेत. त्यांची अडचण ओळखून अंधेरीतील 50 डबेवाले यांना अंधेरी पोलिस विभागात जीवनावश्यक वस्तूंचे (गहू, तांदूळ, कुळीथ, साखर, तेल, तूर डाळ, मीठ, पोहे इ.) नुकतेच वाटप करण्यात आले. या उपक्रमात एस.एन.डी.टी.च्या डाॅ.आशा पाटील डायरेक्टर ऑफ लाईफलाॅग लरनिंग अॅन्ड एक्टेन्शन हेड ऑफ सोशल वर्क,निवृत न्यायाधिश सौ.कल्पना होरे,नाकोडा ज्वेलर्सचे लोकेशभाई , पोलिस उपअधीक्षक सुनिता नाशिककर, पोलिस निरीक्षक मुलाणी , जात पडताळणी ऑफिस दक्षता पथक मुंबई शहरे ,अंधेरीतील संवेदनाक्षम नागरिक प्रदिप छेडा व विशेष म्हणजे अंधेरी पोलीस विभागाचे आदरणीय सहाय्यक पोलीस आयुक्त देसाई साहेब ,स्टाफ सानप व इतर सर्व स्टाफचे मोलाचे सहकार्य लाभले.