Monday, November 11, 2024
Homeबातम्यामुंबई महानगर क्षेत्रात वाढीव बिलाबाबत ऊर्जा मंत्र्यांकडे बैठक

मुंबई महानगर क्षेत्रात वाढीव बिलाबाबत ऊर्जा मंत्र्यांकडे बैठक

मुंबई महानगर क्षेत्रात वाढीव बिलाबाबत ऊर्जा मंत्र्यांकडे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आणि या बैठकीत बिलाचे ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली. ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी बैठकीत संबंधितांना सूचना जारी केल्या.

मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश यादव यांच्या विनंतीनुसार मंत्रालयात ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे, अदानी कंपनीचे कैलास शिंदे, अनिल गलगली, विजय कनोजिया, कचरु यादव, जगदीशन उपस्थित होते. गणेश यादव यांनी मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे पाठविलेल्या बिलाबाबत आक्षेप नोंदविला. त्यांनी शिबिर आयोजित करत लोकांच्या तक्रारी सोडविण्याची सूचना केली. अनिल गलगली यांनी मुद्दा उपस्थित केला की तीन महिने कोठल्याही प्रकारची रीडींग झालीच नाही मग व्हीलिंग चार्ज, फिक्स चार्ज आणि कॅरिंग चार्ज कशाला घेत आहे. कॅपेक्स खर्च कमी केला तर पुढील वर्षी बिल कमी होईल. यापूर्वी मेसर्स अदानी प्रतिवर्षी 400 कोटी खर्च करत आली आहे आता 1200 कोटी खर्च करत आहे. याचा अप्रत्यक्षपणे फटका ग्राहकांना बसतो, असा आरोप गलगली यांनी केला.

ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी काही मुद्द्यावर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे अपील केली असल्याची माहिती देत संबंधितांना सूचना केल्यात. श्री राऊत म्हणाले की जेवढी वीज वापरली तेवढेच बिल येणार.

RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. Undeniably consider that that you stated. Your favorite
    reason seemed to be at the web the easiest thing to consider of.
    I say to you, I definitely get annoyed whilst
    people consider concerns that they just don’t realize about.
    You managed to hit the nail upon the highest and
    outlined out the entire thing with no need side-effects ,
    other people can take a signal. Will probably be back to get more.
    Thanks

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments