आजचे आपले कवी श्री राजेश सुर्वे हे महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागात अधिकारी आहेत.
यापूर्वी त्यांचा “गुरुतत्व” हा भक्तीगीत संग्रह प्रकाशित झाला आहे.
आपल्या न्यूज स्टोरी टुडे परिवारात श्री सुर्वे यांचं मनःपूर्वक स्वागत आहे.☺️
आजच्या जगांत माणसाला
एक चेहरा पुरत नाही
समोरच्या चेहर्यांवरचे भाव पाहुन
आपल्या चेहर्यावर तसा मुखवटा
चढवावा लागतो
म्हणून ठेवले आहेत पाहा
माझ्या मनाच्या भिंतीवर
असे अनेक मुखवटे
आणि गरज लागेल
तसा चढवतो एखादा चेहऱ्यावर
कधी हसरा तर कधी रडका
कधी आनंदी तर कधी दुःखी
कधी प्रेमळ तर कधी क्रोधाचा
कधी आशीर्वाद देणारा तर
कधी गरळ ओकणारा
कधी आपल्यांना क्षणात परकं करणारा
तर कधी परक्यांना आपलसं करणारा
कधी खऱ्या चेहर्यासारखा
तर कधी तसं खोटं भासवणारा
हे मुखवटे चढवता चढवता
आता अस पहा झालंय
आपल्या खरा चेहर्यामागे
एक अजून चेहरा तर नाही ना ?
असं मनाला उगाच वाटतंय.

– रचना : राजेश सुर्वे
😊🙁😀😢😞😡😬🙃🤨😍
खूपच छान कविता.
मुखवटा होय खरंच आजच जीवन तसंच झालं.
अभिनंदन.