मुलगाच कशाला ?
वंशाला दिवा !!
मुलगी काय कमी कशाला
प्रत्येक क्षेत्रात नसे
कुठे कमी कशाला.
मुलगी ही आमची
कन्या विश्वाची
जरी जाईल परक्या घरी
तीच हो सासर माहेरची आस खरी.
बदला जुन्या विचारा
भेदभाव विसरा
सुना, मुलीची शान धरा
तीच वंशाची पणती
ठेवा मनी हिच मती
मरता पाणी तीच पाजील
सांभाळा तिला
मुलगी दुसरी आईच
तुमची तीच होईल.
– रचना : सुरेखा तिवाटणे