Wednesday, March 12, 2025
Homeपर्यटनरमणीय व्हिएतनाम : ३

रमणीय व्हिएतनाम : ३

उत्तरेतील व्हिएतनाम मधील हो-ची मिन्ह शहराच्या भेटीनंतर देशाच्या मध्य भागातील ‘द नांग’ शहर पर्यटनांस फार उत्तम आहे. सहलीच्या दोन दिवसांतच आम्ही पुणे, मुंबई व दिल्लीकर सहकऱ्यांसोबत मिळून मिसळून गेल्याने दंगा मस्ती करत मजेत पर्यटन सुरु असायचे. बस प्रवासात शर्मिला कुलकर्णी यांनी सुमधुर आवाजातील गाण्यावर कधीही डान्स न केलेले ज्येष्ठ जोडीने नाचू लागले. हो ची मिन्ह पेक्षा येथे थंडी जाणवत होती.

ड्रॅगन ब्रीज सकाळी निर्धारित वेळेत तयार होवून स्थानिक गाईड ‘ सू ‘ सोबत आम्ही हान नदीवरील ड्रॅगन ब्रीज परिसरात आलो. प्रसन्न सकाळ अन् तुरळक गर्दी असल्याने नजीकच्या बागेत व मोनुमेंट समोर निवांत फोटो घेतले. संपूर्ण ब्रिजवर गडद पिवळ्या रंगात पहुडलेला ड्रॅगन फोटो फ्रेम मध्ये बंदिस्त करायला जमत नव्हते.

ब्रीजलगत फोटो पोज साठी भरगच्च फुलांनी सजलेले आकर्षक फाऊंटन आहेत. या परिसरात ड्रॅगन विविध रंगाच्या दिव्यात उजळून निघतो. ब्रिजलगतच आमचे फिविटेल हे हॉटेल असल्याने रात्री रंगीत दिव्यात चमचमणारा ब्रीज आयता निवांत न्याहाळता आला.

मार्बल माउंटन लगत पूर्वीचा दुर्लक्षित बीच पण स्वच्छतेमुळे युरोपियन पर्यटकांचा आकर्षण बिंदू ठरला आहे. या बीचच्या कडेने आम्ही मार्बल माऊंटन कडे मार्गस्थ झालो.इथे उंच डोंगरावर मार्बल दगडातील लेडी बुद्ध धार्मिक प्रार्थना स्थळाचे दर्शन घेतले. अवाढव्य उभ्या मूर्ती समोर मोठमोठ्या कोरीव दगडी कुंड्यात विविध आकारातील बोन्साय झाडे प्रेक्षणीय आहेत.

लेडी बुद्ध मूर्ती खाली शांत व शीतल प्रार्थना स्थळ आहे. या परिसरात रस्त्याच्या पलीकडे जमिनीवर निवांत संगमरवरी पहुडलेली बुद्ध मूर्ती अन् पाठीमागची कमान व समोरची बाग लोभस आहे. दुपारच्या भोजन वेळेपर्यंत आम्ही तिथे गुंग झालो होतो. माउंटनच्या पायथ्याशी संगमरवरी मूर्ती अन् आकर्षक वस्तूंचे अनेक मॉल आहेत.
क्रमशः

— लेखन : संजय फडतरे. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित
सौ.मिनल शशिकांत शिंदे, on चित्र भाषा संमेलन : अभिनव उपक्रम