भाग १५
प्रतिबिंब
मंडळी,
व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांचं Olive Trees (1889) हे चित्र पाहताना, केवळ रंग आणि रेषा दिसत नाहीत तर दिसते ती मनात उचंबळणारी हालचाल आणि निसर्गाचं अस्थिर पण तरीही सुसंगत प्रतिबिंब. असं म्हणतात की व्हॅन गॉगला बायबलमधील दृश्यांची कृत्रिम कल्पनात्मक मांडणी फारशी आवडत नसे. त्याला त्याच्या काळात सॅन-रेमीच्या आश्रमात असताना निसर्गदृश्यांमधूनच धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थ दिसू लागले.
ऑलिव्ह वृक्षांमध्ये त्याला गेथसेमनीतील ख्रिस्ताच्या संघर्षाची आठवण होत असे – पण ती इतिहासात अडकलेली नव्हे, तर निसर्गात जिवंतपणे जाणवणारी. त्याच्या ब्रश-स्ट्रोक्समध्ये सखोल आणि विसंवादी रंगसंगतीतून एक प्रकारची चळवळ आपल्याला स्पष्टपणे जाणवते
अशा या नैसर्गिक आणि आध्यात्मिक अद्वितीयतेला शब्दांत मांडण्याचा प्रयत्न म्हणजेच ही कविता – ‘प्रतिबिंब’.
यूट्यूब चॅनलची लिंक इथे खाली देत आहे.
मला आशा आहे की ही कविता तुम्हाला जरूर आवडेल. कविता आवडली तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा, धन्यवाद.

— लेखन : शैलेश देशपांडे. रिचमंड, वर्जिनिया, अमेरिका.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800