Homeसाहित्यवसंत विचार…

वसंत विचार…

कृषी क्रांतीचे जनक, महाराष्ट्राचे दीर्घकालीन मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक, यांच्या जयंतीच्या निमित्ताने सादर समर्पित. वसंतराव नाईक यांना विनम्र अभिवादन.
— संपादक

बा वसंता तुझ्या विचाराने
जर समाज चालला
सा-या जगात होईल बा
तुझ्याच नावाचा बोलबाला !१!

आज समाजातील बा
करणी अन् कथणीमध्ये
का अंतर पडलेय?
जो तो खुर्चीसाठी धावतोय !२!

बा वसंता, होत असशील तू अस्वस्थ
दुर्दशा पाहून समाजाची
मग कसा वाटेल कुणा लळा
विसरच पडला तुझ्या गरीमांचा !३!

एक धावतो एकीकडे
तर दुजा दुसरीकडे
ही स्थिती पाहावते तुला?
कारण,समाजच आपला भोळा !४!

माणसाने माणसांशी
माणसासारखे वागावे
हा मंत्र तुझा लाखमोलाचा
तो प्रत्येकानेच तंतोतंत जपावे !५!

तुझ्याच या विचारांचा बा
आम्ही कसा चुराडा केला
रंगवलेल्या स्वप्नांचे तुझ्या
पार भरडा करून सोडला !६!

तुझ्याच विचारांचे आज बा
जर चारच लोक असते.
तर समाज वैचारिक क्रांतीत
तलवारीचे न्यारेच टोक असते !७!
तलवारीचे न्यारेच टोक असते !!

राजाराम जाधव

— रचना : राजाराम जाधव. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments