Sunday, June 1, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात…

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात…. सदरात आपले स्वागत आहे.
पहलगाम वर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान ला दिलेल्या मुहतोड जबाबाचे पडसाद आपल्या पोर्टल वर उमटणे साहजिकच आहे. त्यामुळे त्या विषयीच्या बातम्या, लेख, कविता आपल्या पोर्टल वर प्रसिद्ध होत आहेत. त्यांना अधिकाधिक प्रसिद्धी देण्याचा आपला प्रयत्न आहे. आपले जवान तिकडे सीमेवर लढत असताना आपण इथे स्वस्थ बसून चालणार नाही. तर अशा परिस्थितीत आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो ? याचा आपण विचार केला पाहिजे. याबाबतीत आपल्याला काही कल्पना, विचार सुचल्यास, कुणी काही चांगले उपक्रम राबवित असल्यास आपण कृपया अवश्य कळवा. अशा लेखनास प्राधान्याने प्रसिद्धी देण्यात येईल.

गेल्या आठवड्याच्या या सदरात नेहा आणि शेखर यांच्या विवाहानिमित्त प्राप्त झालेल्या वाचकांच्या शुभेच्छा या विषयी नुसता उल्लेख केला होता. आज काही वाचकांच्या निवडक शुभेच्छा देत आहे. प्रेम ही जगातील सर्वोच्च महत्वाची भावना आहे. त्यामुळे जगात प्रेम नांदायचे असेल तर अधिकाधिक प्रेम विवाह झाले पाहिजेत आणि ते कायमस्वरूपी टिकले पाहिजेत. यासाठी अशा नवविवाहित दाम्पत्यांना त्यांची कुटुंबीय मंडळी, नातेवाईक, स्नेही, मित्र मंडळी थोडक्यात सर्व समाजाची साथ मिळणे अत्यंत आवश्यक आहे. असो…
प्रेमाने जगा आणि प्रेमाने जगू द्या.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)


सन्मा श्री भुजबळ साहेब,
नमस्कार,
आजच्या न्युज स्टोरी टुडेच्या पोर्टलवर डॉ विजय पांढरीपांडे सर माजी कुलगुरू यांच्या सकस लेखणीतून “ऑपरेशन सिंदूर – डॉ कलाम यांना सलाम” या सर्वंकषपणे लिहिलेल्या लेखातून त्यांची डॉ एक.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या समवेत असलेल्या जवळीकचे संबंध आणि डॉ कलाम यांनी हैदराबाद येथे डी.आर.डी.ओ. चे प्रमुख आणि संचालक म्हणून केलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा संशोधन विशेषतः “इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल प्रोजेक्ट”चे शिल्पकार होते. डॉ कलाम यांच्या कुशल प्रशासक व आपल्या अधिपत्याखालील इंजिनिअर व कर्मचारी – अधिकारी यांच्याकडून काम करून घेण्याचे कसब काही औरच होते अशी पुष्टी डॉ विजय पांढरीपांडे यांनी आपल्या लेखातून गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.

खरंच, डॉ कलाम यांच्या जीवनाचा अभ्यास करताना विशेषतः त्यांचे जीवन चरित्र “अग्निपंख” (Wings On Fire) वाचताना त्यांचे बालपण, शिक्षण किती कठीण परिस्थितीतून झाले याचा विचार केला तर, म्हणावेसे वाटते की, “डॉ कलाम यांनी जीवनात किती मोठी उंची गाठली, त्यापेक्षा ती कशी आणि कोणत्या परिस्थितीत गाठली – याचे मोजमाप केल्यास, ते किती मोठे अजातशत्रू होते, याची जाणीव एक भारतीय म्हणून प्रत्येकांना वाटल्याशिवाय राहणार नाही.

डॉ विजय पांढरीपांडे, यांनी डॉ कलाम यांच्या जीवनाचा आढावा घेताना अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. यास्तव, डॉ पांढरीपांडे यांच्या लेखणीला हॅट्स ऑफ आणि डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या चीर आठवणींच्या आधुनिक मिसाईल सिस्टीमसारख्या देणगी बद्दल ते सा-या भारतीयांच्या मनात कायम – चीर आठवणींच्या हिंदोळ्यावर रमामान राहतील. डॉ कलाम यांच्या स्मृतीला मनापासून अभिवादन !!
— राजाराम जाधव.
निवृत्त सह सचिव, महाराष्ट्र शासन, नवी मुंबई.

तुम्ही म्हटल्याप्रमाणे माध्यमातून गोंधळ नाही तर उच्छाद दिसत आहे. अत्यंत बेजबाबदार आणि बेफिकीर दिसत आहे.
— विलास कट्यारे.
संपादक, सहस्त्रार्जुन जागृती, नाशिक

सर नमस्कार,
आपला माध्यम गोंधळ : संनियंत्रण आवश्यक हा लेख वाचला. लेख वास्तवदर्शी आहे. नॅरेटिव्हज्, फेक व्हिडिओज्, अभ्यास न करताच पत्रकारिता करणे इ. अगदी आमबात झाली आहे. ना कुणाला त्याचे गांभीर्य,ना कुणाला कसली कळकळ! समाज माध्यमातून तर कुणीही उठावे रील बनवून पाठवावे. ना खऱ्या खोट्याची चाड ना देशहिताची पर्वा. यांचा टिआरपी महत्त्वाचा! खरंच आपली सूचना स्तुत्य आहे. त्यामुळे तरी समाज माध्यमांतून प्रसारित होणा-या या बेधुंद, बेजबाबदार बातम्या, मुलाखती, माहिती वक्तव्ये इ.ना आळा बसेल.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली

माध्यम गोंधळ …अतिशय उपयुक्त विचार..नियंत्रण खूप गरजेचे आहे

संजीवजींचा खेबूडकरांवरील लेख आवडला. त्या कवीला माझे नमन

माधवी ताईंवरील लेख बघूनच मला खूप आनंद झाला .. मी त्यांना अग्रेषित ही केला …चित्रा ताईंनी खूप छान लिहीले आहे .. अगदी खरे !

शितल आहेरजींच्या अलक वाचनीय.
अलकाताईंची कविता आवडली.
— स्वाती वर्तक. मुंबई

सन्मा श्री भुजबळ साहेब,
आपण काल साजरा करण्यात आलेल्या हास्य दिनाच्या हास्य पर्वावर आपल्या स्वअनुभवावर आधारित लिहीलेला लेख खूप छान वाटला.आधीच हास्य धारण करून समोरच्या व्यक्तीशी संवाद करण्याच्या आपल्या स्वभावावरून नक्कीच कळून जाते की, आपण खरंच मनमोकळ्या स्वभावाचे हास्य धारण करणारे व्यक्ती आहात. मात्र, ही रहस्यमय गोष्ट समोरच्या व्यक्तीला कळली तरच ना ?
आपण लिहिलेला हास्य दिनाचा लेख आवडला. म्हणूनचा माझा अल्पसा प्रयत्न !!
🌹🌹🤗🤗🙏🙏
— राजाराम जाधव.
निवृत्त सह सचिव, महाराष्ट्र शासन, नवी मुंबई.

सौ. अलकाताई भुजबळ यांना स. नमस्कार वि. वि. ५.५.२०२५ च्या न्यूज स्टोरी टुडे मध्ये आकाशभरारी यू ट्यूब वाहिनीच्या गृहस्वामिनी या सदरातील आपली आकाशभरारी ऐकून मन आपल्याबद्दल आणखी आदर, कौतुकाने आकाश भरून मोठे झाले. आपण केलेल्या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा होईल ! आपल्या या आकाशभरारी, नव्हे गरुडभरारीस माझ्या ब्रह्मांड भरून शुभेच्छा !!
संपादक श्री देवेंद्र जी सरांना स. नमस्कार.
— श्रीमती अलका रामचंद्र मोहोळकर. पंढरपूर

खूपच छान !… रामेश्वरीजी आहेर… यांनी मुलाखती दरम्यान विचारलेल्या चौफेर प्रश्नांना….. आपल्या स्वानुभवातून…तितक्याच… समर्पकपणे…. आणि… दिलखुलासपणे… मा.सौ. अलकाताईंनी … दिलेली उत्तरं… मनाला खूपच भावणारी !….
— अनिल घरत. उरण

राधिका भांडारकर यांच्या,
जडण घडण भाग ४७ वर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया
…..

9.08. लोकल, छान रंगवली आहे.
अगदी जिवंत. जडणघडणीत मोठा भाग आहे.
— छाया मठकर. पुणे

अगदी वास्तववादी वर्णन. भूतकालात फेरफटका मारून आल्यासारख वाटलं
— रेखा राव. मुंबई

Khoopch chhan tumchya aathvani tevhacha n aattacha kitti change jhaly . Radhika tai tari shuddha tya aathvani chhan watatat.
— मीना वाघमारे. अमरावती

बाई गं आज नऊ आठ ने तर अखख्ं विश्वदर्शन घडवलं !
मला वाटलं मीच पंचेचाळीस मिनिटं प्रवास करून आले.
— आरती नचनानी. ठाणे

खूपच छान, भावस्पर्शी.
काळ बदलला, आता गाडीत चढता येईल का ही भीती वाटते. पण त्या लोकल ट्रेन मध्ये माणुसकीचं दर्शन व्हायचं.
— अंजोर चाफेकर. मुंबई

खूपच छान लिहिले आहेस. कॉलेज साठी ठाणे ते माटुंगा आणि नंतर ठाणे ते व्ही. टी. लोकलचा प्रवास, ती मिळवण्यासाठी होणारी धडपड, प्लॅटफॉर्म नंबर तीन वर येणारी लोकल, पाच वर आली की होणारी धावपळ, रोजच्या लोकलमध्ये भेटणारी माणसे, फेरीवाले सारे काही जसेच्या तसे आठवले. काही काळ भूतकाळात रमले. त्यावेळी सारे काही सहज जमत होते, आता तर लोकलने जाण्याचा विचारही करवत नाही.
तेही नो दिवसा गता:
— सुमन शृंगारपुरे. पुणे

लेख आवडला. 50 वर्ष पूर्वी चे ते दिवस आठवले. अशीच लिहीत राहा.
— सुषमा पालकर. पुणे

नेहा आणि शेखर यांचा विवाह आनंदात संपन्न….
नवविवाहित दांपत्यास प्राप्त झालेल्या वाचकांच्या शुभेच्छा पुढील प्रमाणे आहेत
.

नेहा आणि शेखरला वैवाहिक जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा.
खूप खूप अभिनंदन.
प्रभू कृपेने फुलो जीवनी
आनंदाचं सौख्याचं नंदनवन
💐💐💐💐💐💐💐
— राजेंद्र वाणी आणि परिवार. दहिसर, मुंबई

नेहा आणि शेखर यांना लग्नाच्या अनेक अनेक शुभेच्छा आणि दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐💐💐💐💐💐💐
— शंकर निकम. नवी मुंबई

नेहा आणि शेखर …
आनंदाचा विवाह सोहळा खूप छान.
दोघांच्याही नव सहजीवनाला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
— कवयित्री परवीन कौसर. बंगलोर.

चि. सौ.का.नेहा आणि चिरंजीव शेखर यांना खूप साऱ्या शुभेच्छा 💐
— प्रा डॉ संतोष राणे. ठाणे

नेहा आणि शेखर या नवीन दांम्पत्यास, त्यांच्या विवाहप्रित्यर्थ अनेक शुभाशीर्वाद. त्यांच्या वैवाहिक जिवनात त्यांना आर्थिक सुबत्ता सामाजिक सहवास आणि सुस्वास्थ लाभो ही कामना.
शुभं भवतु💐🙏
— आर्किटेक्ट श्रीकांत चव्हाण. मुंबई

नेहा, शेखर या नवविवाहित दांपत्याला त्यांच्या सुखी आनंदी सहचारासाठी, सुखी संसारासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. 💐💐🌹🌹💐
— वीणा गावडे.
मा. मुख्यमंत्री यांच्या निवृत्त जनसंपर्क अधिकारी, मुंबई

नेहा आणि शेखर यांना विवाह बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भुजबळ कुटुंबीयांचे मनःपूर्वक अभिनंदन. 💐💐
— मंगल नाखवा. कक्ष अधिकारी, मंत्रालय, मुंबई.

चि.सौ. नेहा आणि चि.शेखर ह्यांना विवाहबंधनानिमित्त हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा. संपूर्ण भुजबळ आणि शिंदे परिवाराला ह्या शुभ संयोगाप्रित्यर्थ मनःपूर्वक अभिनंदन आणि अनेक हार्दिक शुभेच्छा. 🙏💐
— मृदुला राजे. जमशेदपूर

नेहा आणि शेखर ला विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद.
— कॅप्टन योगेश अभ्यंकर. पुणे
१०
श्री देवेंद्र जी भुजबळ,
आपल्या येथील या मंगल कार्यामध्ये येण्याची खूप इच्छा होती. पण त्या दिवशी अक्षय तृतीया असल्या कारणे येऊ शकलो नाही.कारण आम्ही सर्व भावंड एकत्रित हा उत्सव करतो, त्यामुळे येऊ शकलो नाही. क्षमस्व🙏
आम्हा उभयतांकडून वधू वरास अनेक शुभ आशीर्वाद. भावी जीवनासाठी शुभेच्छा.
— सौ. मंजु संजय वडगावकर. छ संभाजीनगर
११
दांपत्याला खूप खूप हार्दिक शुभेच्छा ! संसार सुखाचा, समाधानाचा, आरोग्याचा व भरभराटीचा होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना !
— ब रा देशपांडे.
निवृत्त उप सचिव, महाराष्ट्र शासन, डोंबिवली
१२
चि. सौ. नेहा न चि. शेखर,
हार्दिक अभिनंदन !
👏👏👏👏
विवाहदिनमिदं भवतु हर्षदम्।
मगंलं तथा त्वां च क्षेमदम।।
(May this wedding day bring to both of you happiness, auspiciousness and well being.)
प्रतिदिनं नवं प्रेम वर्धताम् ।
शतगुणं कुलं सदा हि मोदताम् ।।
(Day by day, may you discover new love for each other. May it grow a hundred fold and your families ever rejoice.)
लोकसेवया देवपूजनम् ।
गृहस्थजीवनं भवतु मोक्षदम् ।।
(Through service to people, as worship of God, may your household life lead to you liberation)
तुमच्या वैवाहिक सुखी जीवनासाठी मंगलमय शुभेच्छा !
🌹🌹🌹🌹🌹
— माधव व ज्योती गोगावले. शिकागो, अमेरिका.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माधव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो !
Shashikant Oak on कथा : २
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on ‘स्नेहाची रेसिपी’ – १७
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनक्रम