नमस्कार मॅडम.
सध्या सर्व वातावरण वारीमय झाले आहे. त्याचे प्रतिबिंब साहजिकच आपल्या पोर्टल वर दिसत आहेतच. या विषयावर आपल्याला काही लिहायचे असेल, काव्य पाठवायचे असेल तर नक्की पाठवा.
आता वाचू या गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)
१
मनीषा ताईंचा लेख छान आहे.. जिजाऊ चे व्यक्तिमत्व उलगडणे सोपे नाही..
तरीही सर्वस्पर्शी वाटतो..
डॉ सुधीर यांचा लेख खरेच अविस्मरणीय…. त्यात अचानक व्यक्तीचे जाणे दुर्दैवी…. सत्य हेच .. दैव ना जाणिले कुणी..
नीलाताईंचा लेख आजच्या अंकातील मणी… डॉ दीपक धर हे विद्वान व्यक्ति.. खूप आदर आहे मला..
छान महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
अरुणजींची कविता सुरेख आहे आवडली.
— स्वाती वर्तक. मुंबई
२
सर, खुप दुख:द बातमी 😥 चितमपल्ली यांच्यासारखे जंगल जगलेली, पाहिलेली, व्यक्ती मी पाहिली नाही. त्यांना मी अनेक वेळा भेटलो आहे. ग्रेट. अशी माणसे आता दुर्मिळ होत चालली आहेत.
भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
— गणेश जोशी. व्यंग चित्रकार, ठाणे
३
“मराठी उद्योजक अभिमान गीत” ही कल्पना अतिशय सुंदर.
जयंतराव ओकांची लिंबाच्या लोणच्याची रेसिपी अतिशय मस्त.
— शुभांगी गान. ठाणे
४
मनीषा पाटील यांचा *राजमाता जिजाऊ* हा लेख सुंदर आहे. खूप आवडला. एक स्री काय करू शकते याचं जिजाऊ हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. खरोखरच लेख अभ्यासपूर्ण आहे.
— राधिका भांडारकर. पुणे
५
कर्करोग संशोधक डॉक्टर सुलोचना गवांदे यांना मनापासून नमस्कार.
आपल्यासाठी अत्यंत गौरवास्पद बाब आहे. डॉक्टर सुलोचना गवांदे यांचे कर्करोग विषयक थोर कार्य आपल्या माध्यमातून सर्वांसमोर येत आहे यासाठी आपणास देखील मनापासून शुभेच्छा
— सौ संगीता व किशोर विभुते. अकोला
६
कर्करोग संशोधक डॉ सुलोचना गवांदे…
खूपच सुंदर माहिती आहे ही. धन्यवाद सर 🙏
— तृप्ती मोहिरे.
७
कर्करोग संशोधक डॉ. सुलोचना गवांदे यांनी कर्करोग संशोधनाबरोबरचं या आजाराबद्दल जनजागृती, लोकप्रबोधनाचं महत्कार्य केल्याचं भुजबळजी आपल्या या लेखातून वाचल्यामुळे गवांदे मॅडमबद्दलचा आदर द्विगुणीत झाला. आपले ज्ञान आपल्या संशोधनापुरते किंवा पदवीपुरते मर्यादित न ठेवता त्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचावी आणि या दुर्धर आजारापासून त्यांची सुटका व्हावी म्हणून यांची सुरू असलेली धडपड त्यांचा मनाचा मोठेपणा सिध्द करतो. खरचं ग्रेट, वंदनीय आहेत त्या.🙏
— वीणा गावडे.
मा.मुख्यमंत्री यांच्या निवृत्त जनसंपर्क अधिकारी, मुंबई
८
जयंताचं लिंबाचं लोणचं आवडलं.
— राम खकाळ.
निवृत्त दूरदर्शन निर्माता, ठाणे
९
जयंत ओक यांची लिंबाच्या लोणच्याची रेसिपी खूप आवडली. कोणती रेसीपी सांगणार आहेत याची उत्सुकता होतीच. या वयात सुद्धा इतक्या उत्साहाने ते पाककृती करत आहेत यांचे मनापासून कौतुक वाटले. हा उत्साह घेण्यासारखा आहे सर्वांनी. त्यांना खूप खूप शुभेच्छा 💐🙏
— सौ स्नेहा मुसरीफ. पुणे
१०
माझी शाळा.. लेख खूप आवडला. श्रीनगर येथील सांस्कृतिक विकासात कसे काम करता येईल हे विदित करणारा लेख छान आहे.
“चंद्रभागा” कविता उत्तम.
— स्वाती वर्तक. मुंबई
११
चितमपल्ली सर हे जसे अरण्यऋषी होते तसेच सिद्धहस्त मराठी साहित्यिक होते.
— प्रा. डाॅ.सतीश शिरसाठ.
प्रा डॉ विजय पांढरीपांडे सरांच्या “आम्ही जागे कधी होऊ ?” या विचार प्रवर्तक लेखावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
१
💫 समाजाच्या संवेदनाशून्यता आणि ढिसाळ दृष्टिकोनावर विचार जागवणारा अत्यंत भिडस्त लेख!🙏
— डॉ गायकवाड. छ. संभाजीनगर
२
छान लिहिलय.
— अरविंद. मुंबई
३
न्यूज स्टोरी टुडे पोर्टल वरील आपला लेख, “आपण जागे कधी होऊ ?” वाचला. खूप छान.
— सीमा वैद्य. ठाणे.
४
Very true. Our emotions are more selfish. We need to rethink about what examples We are setting for others through our maturity, our thoughts and our actions.
— Dr Ahirwadakar.Ch. Sambhajinagar.
माझी जडणघडण भाग ५३ अभिप्राय…..
१
छान ! खूप दिवसांनी वेगळ्या पद्धतीचा भाग वाचायला मिळाला. तुम्ही अमळनेर ला राहिलात का ? पुढे कशा बाहेर पडलात, ते वाचायची उत्सुकता आहे !
— उज्ज्वला सहस्त्रबुद्धे. पुणे
२
खूप छान. एकीकडे आनंद, एकीकडे सर्वांशी जुळवून घेण्याची तगमग,नवीन शिकण्याची हौस आणि दुस-रांची मनं न दुखावता स्वतःला सिद्ध करणं, स्री च्या आयूष्यातले हे स्थित्यंतर किती कठीण असते.
— अंजोर चाफेकर. मुंबई
३
किती ग सुंदर लिहितेस तू !
तुला अहिराणी भाषाही चांगलीच अवगत झाली आहे हे मला आज हा लेख वाचून कळले.
विद्या व्यासंगी कुटुंबातून एका शेतकरी कुटुंबात झालेले तुझे पदार्पण आणि त्या कुटुंबाचा भाग बनून केलेल्या जीवनाचे सूक्ष्म निरीक्षण हे आजच्या लेखाचे खास वैशिष्ट्य आहे असे मला वाटते.
या सर्वात आनंदाने राहून स्वतःचे अस्तित्व टिकविण्याची तुझी जाज्वल्य इच्छा तू उत्तम प्रकारे आजमितीला पूर्णही केलीस हे तुझे यश कौतुकास्पद आहे आणि पुढील पिढीसाठी मार्गदर्शकही आहे.
तुझी ही वाटचाल अशीच यशस्वीपणे चालत रहावी या सदीच्छा.❤️
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका
४
राधिका, प्रत्येक भाग वाचताना तुझ्यातली प्रगल्भ लेखिका जाणवत रहाते.
— आरती नचनानी. ठाणे
५
खुप सुंदर ग्रुहिणी. तुझे लेख वाचताना तुझ्यातले वेगळेपण जाणवतं.
— संध्या जंगले. मुंबई
६
अप्रतिम!
— सुनील सातपुते. संगमनेर
७
नुसती “गृहिणी” नाही, तर एक कलाटणी होती. छान तोल सांभाळला राधिकाताई तुम्ही. लिखाणातून ते कळत आहे.
— छाया मठकर. पुणे
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800