नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात…. सदरात आपले स्वागत आहे. गेल्या आठवड्यातील आपल्या पोर्टल च्या दृष्टीने महत्वाची घटना म्हणजे, न्यूज स्टोरी टुडे यू ट्यूब चॅनल देखील सुरू करण्यात आले आहे. दोन विशेष मुलांना घडविणाऱ्या सौ अर्चना पाटील यांची सौ अलका भुजबळ यांनी घेतलेली मुलाखत चॅनलवर प्रसिद्ध झाली. अतिशय संवेदनशील अशी ही मुलाखत प्रेक्षकांना खूप आवडली. यापुढील मुलाखतींना देखील आपला असाच प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे.
आता श्रावण महिना सुरू झाला आहे. त्यामुळे श्रावणावर आधारित साहित्य आणि कविता आपल्या पोर्टल अधिकाधिक प्रसिद्ध होत आहेत. यापुढेही होत राहतीलच. असो…
आता वाचू या गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)
१
न्यूज स्टोरी यूट्यूब चॅनेलला गोदी कामगारांच्या हार्दिक शुभेच्छा
सर्वप्रथम गेली पाच वर्ष न्यूज स्टोरी टुडे पोर्टल चालविणारे संपादक श्री. देवेंद्र भुजबळ व निर्माती सौ. अलका भुजबळ यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
न्यूज स्टोरी टुडे या यूट्यूब चैनलवर “ओळख” या सदरात सौ. अर्चना पाटील यांची पहिलीच मुलाखत सौ. अलका भुजबळ यांनी अतिशय चांगली घेतली असून, त्याला अर्चना पाटील यांनी देखील अगदी सहजपणे उत्तरे दिली आहेत. एक आई दोन मुलांचा संसार करीत असताना त्यांनी आपल्या जीवन संघर्षाचे वर्णन मार्मिक शब्दात केले आहे. ते ऐकल्यानंतर निश्चितच आईची भूमिका ऐकत असताना अंगावर शहारे येतात. कोणाचाही आधार नसताना कर्णबधिर असलेली मुलगी आंतरराष्ट्रीय नृत्यांगना झाली तर स्वमग्न असलेला मुलगा गणित विषयावर पीएचडी करतो. हे ऐकल्यानंतर मुलांनी आपल्या आई-वडिलांचे नावलौकिक केलं, हे या मुलाखतीतून दिसून येते. आपल्या चॅनलवरील “ओळख” हे सदर लोकप्रिय होवो, अशी सदिच्छा व्यक्त करून, आपल्या चॅनलला मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनतर्फे हार्दिक शुभेच्छा.
आपला
मारुती विश्वासराव. कार्यकारी संपादक, पोर्ट ट्रस्ट कामगार.
२
सौ. अलकाताईंचे अभिनंदन.
ताईंचा हा उचित सन्मान असून न्यूज स्टोरी टुडेचा सन्मान आहे.
— गोविंद पाटील. जळगाव
३
Heartiest Congratulations To Both Of You …
Proud Of Alka …👏
— Meena Gokhale. Mumbai.
४
नमस्कार अलकाताई.
‘न्युज स्टोरी टुडे यूट्युब चॅनेल’ सुरु करुन आपण दाखवून दिले आहे की, कर्तृत्व आणि स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी वय नाही तर जिद्द लागते. आपली यशस्वी घोडदौड अशीच चालू राहील यात शंकाच नाही. आपले खूप खूऽऽऽऽऽऽऽप मनःपूर्वक अभिनंदन.
विंग कमांडर शशिकांत ओक यांच्या हवाईदलातील आठवणींतील सार्जंट तांदळेंबद्दलची आठवण आवडली. ‘बोला फुलाला गाठ’ म्हणतात ते उगाच नाही!
श्री. मुरारी देशपांडे यांची, लोकमान्य टिळक यांच्यावरील कविता खूप छान.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली
५
congratulations Dear Madam for ur new enterprise n unending enthusiasm in this age. Also compliments to Bhujbal sir who is the inspiration behind u n behind several others
— Ranjit Chandel. Yeotmal.
६
Respected Alkajee
Hearty Congratulation.
— Ajit Deshpande. Pune
७
अलका भुजबळ यांनी अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन देवेंद्रजी ना अत्यंत मोलाची साथ दिलीच शिवाय news story’ today portal ची आणि यू ट्यूब चॅनल ची निर्मिती केली त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक आणि अभिनंदन.
— जयंत ओक. मुंबई
८
सौ अलकाताईं भुजबळांचे मनापासून खुप खुप हार्दिक अभिनंदन… परमेश्वर त्यांना दीर्घायुरारोग्य प्रदान करो..
ही प्रार्थना.. 💐🙏
— लक्ष्मीकांत विभूते. नवी मुंबई.
९
अलका ताई.. 🎉
आपल्या मेहनतीचे फळ, आम्हा सर्वांना देखील मिळते. साहित्यिक क्षेत्रातील, ताज्या घडमोडी आम्हाला घर पोहोच होतात.. 👌
मनापासून हार्दिक अभिनंदन..🎉
— सुभाष कासार. नवी मुंबई.. 💦
११
न्यूज स्टोरी टुडे यू ट्यूब चॅनल सुरू झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन ! शुभेच्छा !!
— नागेश शेवाळकर. पुणे
१२
आपल्या न्यू स्टोरी टुडे पोर्टलला पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🌹🙏
— गिरीश देशमुख. मुंबई
१३
सर, आपले उभयताचे यू ट्यूब चॅनल चे उद्घाटनाबद्दल मनभरून हार्दिक अभिनंदन अन् भरभरून अगणित शुभेच्छा.
— सौ मीना घोडविंदे. ठाणे
१४
यू ट्यूब चॅनल सुरू केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन 👏👏💐💐💐
— प्रीती लाड. पनवेल
१५
सर लेख वाचला. 👍 सर्वांना खरंच जागरूक करणारे शब्द आहेत, वाचून आश्चर्य तर वाटलेच परंतु खेदही वाटला. आपली पुढची पिढी या बोगसगिरी वर भविष्यात कोणती प्रगती साधेल. ?
देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान व्यक्तीच्या पदवीच्या खरेपणा बद्दल जर जनतेतून शंका घेतली जावी व त्यावर सोशल मिडिया वर पुरावे सादर व्हावे. यापेक्षा देशाचं आणि भारतीयांचं दुर्दैव ते काय ?🤦♀️
अहो टिव्ही दादा 😊 आपल्या लग्नाचा एखादा छानसा फोटो टाकायचा नं शेवटीं 😀
👌 मस्तच आठवण लिहीली.
— आशा कुलकर्णी. मुंबई
१६
नागपंचमीनिमित्त लिहिलेला सुरेख लेख. एका लग्नाची गोष्ट जिने एका पोर्टलला जन्म दिला.
— प्रा डॉ सतीश शिरसाठ.
१७
आदरणीय
संपादक साहेब
बोगस डॉक्टरेट वर डोळयात अंजन घालणारा लेख.
— गोविंद पाटील. जळगाव
१८
नमस्कार देवेंद्र,
तुमचा ‘बोगस “डॉक्टरेट” पासून सावध रहा’ हा लेख खूप आवडला. 👏👏👏
सर्व वर्तमानपत्रात हा लेख प्रकाशित केला पाहिजे. यातून लोक जागृती नक्कीच होईल.
पदव्या ह्या पैशाने विकत घेण्याचा नसतात.
धन्यवाद.
— माधव गोगावले. शिकागो, अमेरिका
१९
आपल्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टल ची प्रेरणादायी वाटचाल वाचून खूप बरे वाटले.
अशीच पाऊले पुढे पडत राहोत.. या शुभेच्छा .
आलोक यांची दोन्ही ही पुस्तकं उत्तम दिसत आहेत. प्रस्तावना वाचून पुस्तके विकत घेण्याचा मोह होतोच. असे संवेदनशील, विवेकी आणि स्वतंत्र दृष्टी असणारे माध्यमकर्मी ही काळाची गरज आहे.
राधिकाताईना देना बँकेच्या नवीन वाटचालीत आपल्याच माणसाची साथ मिळणे, पाठीशी असणे महत्वाचे. त्यामुळेच आयुष्य सुकर होत जातं राधिकाताई
नाग पंचमीच्या कविता छान.. गांगलजी तर आता अगदी मुरलेलेच आहेत. भक्तिगीत, सण वार भावपूर्ण असतात.
— स्वाती वर्तक. मुंबई
२०
श्री. नागेश शेवाळकर यांचा ‘न्युज स्टोरी टुडे… प्रेरणादायी वाटचाल’ हा लेख वाचला. खरंच हे पोर्टल सकारात्मक आनंददायी भूमिकेची पाठराखण करते. इंद्रधनुष्य जसे सप्तरंगांनी खुलून दिसते तद्वत सदर पोर्टल साहित्य, कला, संस्कृती, माहिती, पर्यटन,व्यक्तीविशेष इ.विविध क्षेत्रांतील लेख, कथा, कविता, ललित इ.द्वारे खुलत चालले असून दिवसेंदिवस अत्यंत लोकप्रिय होत आहे. अर्थातच श्री.देवेंद्रजी आणि सौ.अलकाताई यांच्या अथक प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले आहे. सदर पोर्टल पाच वर्षेच नाहीतर रौप्य, रजत, अमृत असे महोत्सव साजरे करील यात शंकाच नाही.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली
२१
पोर्टल चे सर्वेसर्वा श्री व सौ, भुजबळ दाम्पत्य, यांनी, 5 वर्षाच्या कालावधीतील लेखनाचा सर्वांगीण, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, पत्रकारिता, विशेष व्यक्तींचा वैशिष्ठयपूर्ण कार्य +जीवन प्रवास, काव्य, नैमेत्तीक, क्रीडा, ई. कलागूण, यांचा लेखनात समन्वय साधत, निवृत्ती नंतरच्या जीवन प्रवासात, अनेक कलाकार, लेखक, कवी, कवयित्री, समाजसेवक, शिक्षक, यांना लेखनद्वारे प्रकाशमान केले आहे, याचा उत्तम उहापोह, श्री, नागेश शेवाळकर, पुणे, यांनी भुजबळ दाम्पत्य यांच्या कार्याची महती अगदी समर्पक शब्दांकित केली आहे. त्यास्तव, श्री, शेवाळकर यांचे धन्यवाद, अन श्रीव सौ भुजबळ उभयता यांचे, मनभरून कौतुकासह, अभिनंदन अन भरभरून अगणित शुभेच्छा 🙏
कौतुक करावे तितके कमीच 🌹
— सौ मीना घोडविंदे. वनगे, ठाणे.
२२
मा. देवेंद्र भुजबळ यांचा बोगस डॉक्टरेटवरचा लेख वाचून प्रचंड धक्का बसला. *जगी हा खास फसव्यांचा पसारा माजला सारा..* असेच वाटले.
— राधिका भांडारकर. पुणे
२३
विद्यापीठांनी सुद्धा ऑनर री डॉक्टरेट देणे बंद केले पाहिजे. एरवी जी पदवी घेताना विद्यार्थी चार पाच वर्षे मेहनत घेतो,अभ्यास करतो ती पदवी कुणाला काही काम न करता देणे गैरच म्हटले पाहिजे. याच कारणा साठी राहुल द्रविडने ही पदवी नाकारली होती ! अर्थात लता मंगेशकर सारख्या अद्वितीय स्वर, गळा लाभलेल्या गुणी गायिकेला पदवी दिली तर आक्षेप नसावा. कारण तिथे साधना तपश्चर्या आहे. पण राजकारणी पुढाऱ्यांना एक नव्हे अनेक विद्यापीठ पदवी देतात तेव्हा तिथल्या प्रशासनाची कीव करावीशी वाटते.याला बौद्धिक दिवाळखोरी म्हणतात. बोगस पुरस्कार, बोगस पदव्या हे आपल्या सांस्कृतिक दारिद्र्याचे खुले प्रदर्शन आहे !!
कसलेही मूलभूत संशोधन न करणारे शास्त्रद्न्य म्हणवले जातात.. परम संगणक कुठे मिळतो,कुठे कोण वापरतो याचे उत्तर मिळत नाही.पण त्या कार्य कर्तृत्वासाठी पद्म पुरस्कार मिळतात ! सगळा सावळा गोंधळ !
आपण चांगल्या विषयाला वाचा फोडली.
— प्रा डॉ विजय पांढरीपाडे. माजी कुलगुरू, हैदराबाद.
माझी जडणघडण भाग ५९ अभिप्राय.
१
तेव्हा बॅंकेतील नोकरी म्हणजे खूपच attractive वाटत असे ! आणि खरं च होते ते ! पगार चांगले, मान असे, स्थळ म्हणून ही एक व्हॅल्यू असे !
— उज्वला सहस्रबुद्धे. दुबई
२
छान लिहिले आहे. प्रत्यक्षातच बोलूया.
— सुचेता खेर. पुणे
३
गृहिणी, माता आणि नोकरी या तीन भूमिका यशस्वी रीतिने पार पाडणे ही प्रत्येकच स्त्रीची तारेवरची कसरत असते.
स्वानुभवातून लिहिलेला तुझा हा प्रातिनिधिक लेख प्रत्येक स्त्री वाचकाला आवडेल यात शंकाच नाही.
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका
४
व्वा ! किती छान उलगडली आहेस मनातली घालमेल!खूप सुंदर!
— आरती नचनानी. ठाणे
५
As always enjoyed your storyline. 👌💕
— सुमेधा काळे. चेंबूर
६
तुझ्या नोकरीची घालमेल वाचून मला माझ्या एलआयसीच्या नोकरीची आठवण झाली. पण मी तुझ्या सारखी जिद्दी आणि खंबीर नव्हते. लगेच हातपाय गाळून नोकरीचा राजीनामा दिला आणि छोट्या मुलात पूर्णपणे गुंतून गेले. एक मात्र खरं की त्यावेळची परिस्थीती किती सारखी होती आणि सगळ्यांचे विचार किती सारखे होते याचा प्रत्यय आला. नकळत आताच्या आणि तेव्हाच्या जडणघडण मधला फरक जाणवला.
— रेखा राव. मुंबई
७
तुमची बँक दौड जोरात सुरु झाली.
सर्व छान उद्धृत केले आहे.
— छाया मठकर. पुणे
८
छान लिहिले आहे. देना बँकेत जॉब मिळाला आणि त्या वेळची मनस्थिती, व द्विधा झालेले मन, त्यात सहा महिन्याची ज्योतिका, पुढे तिला सांभाळून नोकरी करणे कसे होईल ? आपल्याला हे सर्व जमेल कां !!! ? एकूण सर्वं छान लिहिले आहेस. 👌🏻👍🏻🌹🪷🌹🪷🌹🌼💐💞💓🩵
— विलास भांडारकर. पुणे
९
वास्तविक ही घालमेल, अपराधीपणाची भावना, चूक की बरोबर हा संभ्रम सगळं प्रत्येक स्री अनुभवते. पण शब्दांत व्यक्त करणं तुलाच जमतं.
— अंजोर चाफेकर. गोरेगाव
— टीम एन एस टी. ☎️c9869484800