नमस्कार मंडळी.
सध्या नवरात्र उत्सव साजरा होत असल्याने, त्याचे प्रतिबिंब आपल्या पोर्टल वर दिसत आहे.आशा आहे की, आपल्याला ते नक्कीच आवडत असेल. २ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. दसऱ्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
आपल्या पोर्टलचे नियमित लेखक श्री रणजित चंदेल हे त्यांच्या लेखणीद्वारे समाज प्रबोधन करीतच असतात. पण त्यांच्या लेखणीला ते प्रत्यक्ष कृतीची जोड देत असतात, हे विशेष.त्यांनी त्यांचा ७५ वा वाढदिवस अनाथ बालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या पसायदान गुरुकुल संस्थेत साजरा करून हे दाखवून दिले आहे. या संस्थेवर त्यांनी लिहिलेल्या लेखास वाचकांचा छान प्रतिसाद लाभला आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
आता पाहू या गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)
श्री रणजित चंदेल, निवृत्त माहिती अधिकारी, यवतमाळ यांनी लिहिलेल्या “आधुनिक पसायदान” या अनाथ बालकांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेवर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत….
१
श्री.योगेश्वर वाघ यांचा प्रवास थक्क करणारा आहे. श्री.चंदेल सरानी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून आपला वाढदिवस पसायदान या संस्थेत साजरा केला. यामुळेच एका भावस्पर्शी कामाची राज्याला ओळख झाली. श्री योगेश्वर वाघ व श्री रणजीतसिह चंदेल सर यांचे मनापासून आभार.
— संतोष अरसोड. मुक्त पत्रकार, नेर
२
उत्तम लेखन. अभिनंदन
— अँड अमोल बोरखेडे.
३
अमृत महोत्सव अभिनव पद्धतीने साजरा केला. हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
— संभाजी राणे. उपायुक्त (निवृत्त)
४
Very Good Article Chandel Ji👌👌
Such people are rare in our society. But they are the guiding light of the society.
— Madhuri Bawiskar.
Addl supd of police, ACB, Nagpur
५
श्री. चंदेल सर आपले मनःपूर्वक आभार.🙏
आपण पसायदान गुरुकुलची बातमी जनसामान्यांपर्यंत सुंदर शब्दांमध्ये पोहोचवली. आपल्या शब्द मांडणीतील प्रभावीपणा व भावनाशीलता खरंच प्रशंसनीय आहे.🙏🌹 _ योगेश वाघ,
पसायदान गुरुकुल
६
Thanks you Sir.
Khup chaan lihile ahe🙏
— Sachin kadu. Social activist, Pune
७
Salute to the Inspiring work done by पसायदान संस्था. Hope all of us derive inspiration from you to give back to society. Beautifully articulated by Shri Chandel sir, thank you spreading Happines and inspiration to your readers.
— Dr Chetan T Rathod, Neurosurgeon, Yavatmal.
८
It is a inspiration for us to see ur 75 th birthday celebration Respected Chandel Sir with needy students of Pasaydan Ashram and to see joy on students face while ur birthday celebration. It will definitely inspire many more like me and will definitely will be helpful to needy society. I wish you happy life and good health ahead.🙏💐🙏
— Dr Varsha Chavan, Gynecologist, Yavatmal.
९
Chandelji..
An Adorable and Admirable work for Society.The Contribution for the up liftment of the needy children of the society is unmatched and appreciable.An eye opening article for everyone of us.
— Dr Avinash Kolhatkar.
Principal, Sanmati Engineering College Washim.
१०
रणजीतसिंहजी चंदेल यांच्या पसायदान या लेखाच्या माध्यमातून श्री योगेशजी वाघ; ज्यांनी लहानपणीच आईवडिलांना पोरके होऊन सुद्धा स्वतःच्या भरवशावर उच्च शिक्षण घेऊन व मिळालेली नौकरी सोडून आपला स्वार्थ न साधता परमार्थासाठी आपले जीवन वाहून दिले अशा या अवलियाची ओळख झाली. योगेश वाघ यांच्या कार्याला शतशः वंदन आणि आपला ७५ वा वाढदिवस या पसायदानातील परिवारासोबत साजरा करीत या वयातही समाजाप्रती असलेली संवेदनशीलता जपणारे आणि या लेखनाच्या माध्यमातून योगेश वाघ या अवलियाचे दर्शन घडविणारे श्री रणसिंहजी चंदेल यांचे मनापासून अभिनंदन
— डॉ. संजय एम. गुल्हाने.
प्रिन्सिपॉल, प्रवरा रुरल इंजिनियरिंग कॉलेज, लोणी
श्री सुनील चिटणीस लिखित ‘झेप’ सदरावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत…
१
पुष्पलताताई देशपांडे यांची कारकीर्द खूप छान आहे. 💐
— क्रांती उपरे. अंबेजोगाई.
२
ग्रेट….🙏
— डॉ किरण चित्रे. दूरदर्शन निर्माती, मुंबई
प्रा डॉ विजय पांढरीपांडे सरांच्या “मोबाइलचा आजार : तरुणाईचा आजार” या लेखावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया….
१
खूब छान विवेचन।
आजचे वास्तव आहे।
— डॉ गोविंद गुंठे.
लेखक तथा दूरदर्शनचे निवृत्त संचालक नवी दिल्ली.
२
अगदी आजचे सत्य वास्तव लेखातून मांडले आहे, प्रा.डाॅ.विजय पांढरीपांडे सरांनी.
— गोविंद पाटील. जळगाव
३
आदरणीय सर,
आपण वर्मा वरच बोट ठेवले असे वाटते. पुढील भेटीत चर्चा करू. धन्यवाद सर..
— प्रा कवडे. एम आय टी, छ. संभाजीनगर
४
मोबाईलचा बाजार तरुणाईचा आजार हा लेख सध्याची एकंदर सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा. अतिशय अभ्यासपूर्ण आणि सद्य परिस्थितीची जाणीव देणारा उत्तम लेख आहे.
_ शुभांगी गान, ठाणे.
५
अमेरिकेत असं काय आहे यावर उत्तम विचार मांडले आहेत डॉ पांढरीपांडेजींनी.
स्नेहाताईंनी सर्वच देवीची महती नीट विषद केली आहे. आवडले
“फ्रेनेमी” उत्तम.
— स्वाती वर्तक. मुंबई
६
बॅ.नाथ पै यांना शतशः वंदन करून त्यांची समग्र माहिती या लेखाच्या अनुषंगाने कळू शकली, त्याबद्दल शा.गो.पाटील यांना धन्यवाद. बॅ.नाथ पै हे माझ्या गावचे, वेंगुर्ल्याचे असल्यामुळे मला त्यांचा विशेष सार्थ अभिमान आहे.🙏🙏
— वीणा गावडे. मुंबई
७
“निळाईच्या छटा” हा पुस्तक परिचय देणारा लेख चांगल्या रित्या लिहिल्या गेलाय. वाचतांना त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा केवढं तरी भव्य दर्शन होत. खरंच आपले सैनिक वैमानिक किती मोठे धाडस करतात तेही फक्त आपल्यासाठी, देशासाठी खूप अभिमानास्पद.
— शुभांगी गान. ठाणे
माझी जडणघडण भाग ६७ अभिप्राय……
१
खूप टचिंग आहे. त्याकाळात Child psycology हा विषय माहितच नव्हता. त्या काळातले बरेचसे कलाकार हे घरातून पळून बाहेर वणवण करून कलाकार झालेत.
स्रियांना तर शिक्षणाला ही विरोध.
— अंजोर चाफेकर. गोरेगाव
२
राधिकाताई,
आधी तर एक सांगू इच्छिते… तुम्ही खूप छान व्यक्ती वर्णन करता.. वाचताना ती व्यक्ती आपल्या समोर हजर आहे असे वाटते..
पंढरीची कथा हे शिर्षक वाचताना असं वाटलं आज तुमच्या सोबत पंढरी गाठायची आहे.. पण पुढे जाणवले की ही पंढरीनाथ यांच्या वर आधारित भाग आहे..
अतिशय सुंदर वर्णन.. पुढचा भाग वाचण्याची उत्सुकता आहे.
— मानसी म्हसकर. वडोदरा
३
उणीवा, त्रुटी भरुन काढण्याची स्वत:तच ताकद हवी, कित्ती छान सांगितले राधिकाताई तुम्ही ! आज एका वेगळ्याच व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली.
— छाया मठकर. पुणे
४
I liked yr story of Pandhari but I found it incomplete s wd love to know why she had called u to meet her.
— जयश्री कोतवाल. पुणे
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800