नमस्कार मंडळी.
आज संविधान दिन आहे. या संविधान दिनाच्या निमित्ताने आपण संविधानाची प्रत आपल्या घरी आणण्याचा आणि घरातील प्रत्येकाने ती वाचनाचा आणि वाचून अंगीकारण्याचा प्रयत्न करू या. या दृष्टीने अनुराधा जोशी यांनी, आज आपल्या पोर्टल वर लिहिलेला लेख आपण अवश्य वाचा.
आता बघू या गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)
1
देवेन्द्र जी, मीना गोखले – पानसरे
उत्तम आलेख। धन्यवाद ।
— डॉ गोविंद गुंठे. निवृत्त दूरदर्शन संचालक. नवी दिल्ली
2
खुप सुरेख आणि सुंदर शब्दांकन आहे. मीनाताई बरोबर मी जवळपास 5 वर्षे काम केले आहे. तुम्ही लिहिलेला शब्द न शब्द अगदी योग्य आहे. ह्याची प्रचिती मला आली आहे. 🙏
— नंदन पवार. नागपूर
3
मीनाच्या कर्तृत्वाचा आलेख उत्तमप्रकारे लेखातून साकारला आहेस. अभिनंदन !
— डॉ किरण चित्रे. मुंबई
4
मीना बद्दलचा दीर्घ लेख वाचला, आवडला, छान लिखाण आणि संकलन…..
— शशिकांत कुलकर्णी. ठाणे
5
खूपच चांगला लेख आहे. आवडला, जुने ते सोनेरी दिवस आठवले.🙏
— राजीव गोखले, निवृत्त दूरदर्शन संचालक, पुणे
6
फारच छान.. जुन्या आठवणी जाग्या झाल्या…. धन्यवाद.
— विनायक देव. मुंबई
7
वामनदादा कर्डक यांच्या बाबत खुपच छान, प्रदीर्घ मुलाखत घेतली आहे. नाविन्यपूर्ण वाचायला मिळाले. धन्यवाद सह अभिनंदन सर. 🪷🙏👍🏻
— दुर्गानंद वाळवंटे.
राधिका भांडारकर यांच्या जडणघडण वर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया….
१
राधिकाताई, तुमच्या मुलींच्या लग्नाच्या सोहळ्याचे वर्णन करणारे दोन्ही भाग अतिशय सुंदर होते. काही काही वेळा तर अक्षरशः डोळ्यातुन पाणीच आले. योगायोग म्हणावा तो किती तुमच्या जीवनात आला आहे. खरंच आश्चर्यच वाटलं. या भागातील सर्वात शेवटला पॅरेग्राफ वाचला आणि खरंच डोळ्यासमोर मला माझी आई दिसली. पुढच्या भागेच्या प्रतिक्षेत
— मानसी म्हसकर. वडोदरा
२
दोघीही लेकी आणि दोन्ही जावयी छानच. 👌
— अस्मिता पंडीत.
३
नेहमी प्रमाणे सुंदर डोळ्यापूढे ऊभ राहणार चित्रण. कर्तव्यपूर्ती आणि वियोगातून मी सुध्दा गेलेय .त्यामुळे मनाची चलबिचल अनुभवली आहे.
— रेखा राव. विलेपार्ले
४
ज्योतिका व मयुरा दोघींचाही लग्न सोहळा पुन्हा मनःचक्षूंनी पाहिला आणि अत्यानंदाचा अनुभव घेतला. ज्याच्या लग्नाच्यावेळी रुग्णशय्येवर मरणासन्न अवस्थेत आईला पुन्हा पाहताना मात्र डोळे अश्रूंनी डबडबले. मुली काय किंवा मुलगे काय, त्यांच्या संसारात व्यस्त झाल्यानंतर आई वडिलांच्या जीवनात खूपच मोठी पोकळी निर्माण होतेच. हीच जगरहाटी आहे आणि त्यातच समाधानही आहे.
नेहमीप्रमाणे लेखन अप्रतीम!
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका
५
अप्रतिम लेख, भावनांना स्पर्शनारा.
— अंजोर चाफेकर. गोरेगाव
६
बिंबा, जेव्हां जमेल तेंव्हा वाचते तुझी जडणघडण. तुझं हे घरटं भारी आपलसं वाटलं मला. आईची ह्रद्य आठवण ही आपल्या मुलींसाठी नेहमीच हळवी असते. तुझ्या दोन्ही लेकी जावयांचं कौतुक वाचायला छान वाटलं. सगळेच हुशार आणि कर्तृत्ववान. तुझ्या मुलीच्या लग्नात कवीवर्य ना धो महानोरांची उपस्थिती ही केवढी ग भाग्याची गोष्ट ! सदाबहार आठवण 🙏असो.
आपलं घरटं बहरंत असतं आणि एक दिवस चिमण्या वेगळ्या विश्वात झेप घेतात. ती पोकळी जाणवत असते. पण त्यांच्या सुखात आपलं सुख नाही का ?
नेहमीप्रमाणे भावूक लेख 👌
— अलका वढावकर. ठाणे
७
नं. 73 –‘ आमचं घरटं ‘ —
मयुरा – संकेत, लग्नाच्या गाठी अगोदरच बांधलेल्या असतात असं वाटत राहतं. तसे संकेतही मिळतात. तुझे व्याही छान. मयुरा – संकेत खूप छान दिसत आहेत. लग्न जळगांवला झालं. वाचून छान वाटलं, तुझ्या दोन्ही मुली आणि जावयांना अनेक शुभेच्छा ! 🌹🌹
— अनुपमा आंबर्डेकर, मुंबई
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800.
