Monday, January 26, 2026
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
आपल्या पोर्टल चे कवी, हितचिंतक, मार्गदर्शक डॉ मिर्झा बेग यांच्या निधनाने, काव्यजगता बरोबरच आपल्या पोर्टल ची देखील मोठी हानी झाली आहे. त्यांच्या वरील गौरवपर लेख आपण प्रसिद्ध केला आहेच.
आता पाहू या, गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया…
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (निर्माता)

1
डॉ मिर्झा बेग हे अतिशय सुंदर व्यक्तिमत्व लाभलेले खुल्या मनाचे होते. हसत खेळत कोपरखळ्या मारणे ही त्यांची खूमासजदार शैली होती. विदर्भ नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अनेकांच्या मनात त्यांनी आपलं स्थान विराजमान केलेलं आहे.
हे कधीच कमी होणे नाही. त्यांची आठवण येतच राहील…
— किशोर विभुते. अकोला

माझी जडणघडण भाग ७४ अभिप्राय….

बिंबा, माहिती नाही का पण शेवट वाचताना मन भरून आलं.
As usual very nice reading.
— संध्या जंगले. मुंबई

नेहमी प्रमाणे सुरेख शब्दांकन !
— रेखा राव. विलेपार्ले

यथार्थ मत आपले “प्रवास” बद्दल. सर्व समृद्ध प्रवास. तुमचे व्यक्त होणारे मतही “समृद्ध”
— छाया मठकर. पुणे

खूप छान. मनस्पर्शी.
प्रवास तर तू इतका केला आहेस की त्यावर तुला वेगळे पुस्तक लिहावे लागेल.
पण प्रवासात भेटणारा माणूस, ना नात्याचा, ना ओळखीचा, तरीही तो सारखा असतो हे छान दाखविलेस.
— अंजोर चाफेकर. मुंबई

छानच लिहिलं आहेस…
— सुचेता खेर. पुणे

राधिका ताई,
अतिशय तुम्ही सुंदर रित्या तुम्ही तुमच्या प्रवासांचे अनुभव लिहिले आहेत. खरंच प्रवास म्हणजे अनुभवांची शिदोरीच असते. आता हळूहळू आम्ही सुद्धा थोडेफार जबाबदारीतून मुक्त झाले असल्याने हाच मार्ग निवडला आहे, प्रवास करायचा, माणसं ओळखायची, वाचायची, त्यांचे अनुभव घ्यायचे, आपले अनुभव शेअर करायचे .. आणि खूप छान वाटलं मला.. काही काही ठिकाणं मी सुद्धा पाहिलेलीच आहेत त्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी फेरफटका तुमच्या शब्दांत मार्फत मारून आले.. खूप सुंदर प्रवास अनुभव.. एक स्वतंत्र पुस्तक तयार करा..
— मानसी म्हसकर. वडोदरा.

खूप छान आठवणी !
परदेशात गेल्यावर मुलांना आणि आपल्यालाही ज्यावेळी भेट होते तेव्हा आपोआपच भावना उचंबळून येतात.
तुम्ही लिहिलेली आठवण वाचून मलाही माझी पहिली सिंगापूर भेट आठवली. त्यावेळी माझी मुलगी प्रथमच कामानिमित्त परदेशात ऑन साईट गेलेली होती. आम्ही दोघे सिंगापूरच्या विमानतळावर उतरून तिला जेव्हा प्रथम दिसलो तेव्हा अशीच घट्ट मिठी अनुभवायला मिळाली ! ती कधीच विसरण शक्य नाही !
— उज्ज्वला सहस्रबुद्धे. पुणे

फार छान अनुभव लिहिलेत ताई,
खजुराहो आम्हीपण पाहिले, थक्क करणाऱ्या कलाकृती आहेत.
— सुमती पवार. नाशिक

भाग – 74, ‘माणूस’ — खूप छान लिहिलं आहेस. प्रवासातील अनुभव, तुझ्या मनात आलेले विचार – सर्वच.
लगेच माझ्या मनातील भारत आणि जगभर प्रवासाच्या आठवणींचे तरंग उठले.
— अनुपमा. मुंबई
१०
तुझा हा लेख अत्यंत भावदर्शी आहे. प्रवासवर्णने सगळेच लिहितात, पण तुझ्या या लेखातून तुझे अतिशय हळुवार आणि संवेदनशील मन वाचायला मिळाले.
फारच छान !
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments