Saturday, May 10, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार, मंडळी.
आपल्या न्यूज स्टोरी टुडे ला देश विदेशातून मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतच आहे, ही आनंदाची बाब आहे.
पुढे प्राप्त झालेल्या प्रतिसादावरून हे दिसून येईलच.
सर्व लेखक,कवी व वाचकांना मनःपूर्वक धन्यवाद.
आपला
देवेंद्र भुजबळ, संपादक

डाॅ. किरण झरकर यांना स्किल बुक या बहुउपयोगी आधुनिक संशोधित प्रकाशनासाठी शुभेच्या आणि शुभचिंतन.
– राम खाकाळ
निवृत्त दूरदर्शन निर्माता

शतायुषी रामभाऊ जोशी यांच्या बाबतीत सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
आणीबाणीच्या काळात मी पुण्यात होतो. त्यांची शेवटची भेट मंत्रालयात श्री अशोक देशपांडे महासंचालक असतांना झाली होती. धन्यवाद देवेंद्र जी.. किरण जी….. 🌹🙏🌹
सुधाकर धारव
निवृत्त माहिती उपसंचालक

पुण्यात जिल्हा माहिती अधिकारी असतांना रामभाऊंची अनेकदा त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे.
गुरुवर्य किरण ठाकूर सरांनी रामभाऊंची माहिती दिली आहे. खरोखरच अफाट स्मरणशक्ती असलेल्या रामभाऊ जोशींना शुभेच्छा !
-विजय पवार
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी

रामभाऊ जोशी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🙏
-अनिल चाळके
गिर्यारोहक व सामाजिक कार्यकर्ते

मान्याची वाडी सौर ऊर्जा 👌🏻👌🏻 मस्त योजना. प्रत्येक खेड्यात, गावात असे झाले पाहिजे.
-संगीता सावंत
महाड

प्रकाश भंडारे यांना वाहिलेली श्रध्दांजली हा आपल्या स्नेहाच्या उत्कट भावनेतून साकार झालेली उत्तम साहित्यकृती आहे.
नागेश शेवाळकर यांचं चहापुराण वाचनीय आहे.
– डाॅ.सतीश शिरसाठ

🏋🏻‍♂️श्री रामभाऊ जोशी यांच्या वरील डॉ. किरण ठाकूर यांचा लेख वाचला.अप्रतिम वाटला.एखाद्या व्यक्तीचे उत्तम रीत्या सर्व संबंध देऊन परिचय लेख कसा लिहावा याचे गुरूवर्य किरणजी कडून पुन्हा एकदा धडा मिळाला.त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन.सात वर्षे पुणे जिमाअ असतांना त्यांचा सहवास व मार्गदर्शन सातत्याने लाभत होते.त्यांनाही आठवणीने नमस्कार सांगावा.धन्यवाद
🏋🏻‍♂️सुधाकर तोरणे

आपण लिहिलेला प्रकाशजी भंडारे यांच्याविषयीचा भावपूर्ण श्रद्धांजली वरील लेख वाचून त्यांच्या विविध आठवणींचे स्मरण झाले. ते माझेहि जिव्हाळ्याचे मित्र होते.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…..
सु ह तोरणे🙏🏻🙏🏻🙏🏻

हिरकणी समूह आणि त्याच्या अध्यक्षा वनश्री ताई …..अफाट आहेत. नम्र अभिवादन 🙏
-नीला बर्वे
सिंगापूर

लालबत्ती
डॉ.राणी आपण मांडलेला विचार काळजात घर करून राहिला आहे.कोणताही दोष नाही ,गुन्हा केला नाही पण रेड लाईट area येथील ही मुले दुर्लक्षित राहतात.शिक्षण हे माध्यम त्यांना चांगल्या जगात नेऊन सोडेल.
आपल्या कार्याला सलाम!
– Meghana Sane

सेवाज्योत : ज्योत्स्ना शेटे
तुमचे विविध क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे .
शिक्षक समिती मध्ये सुद्धा आपले कार्य सतत सुरु आहे .
आपली अशीच प्रगती होवो .
पुढील वाटचालीस शुभकामना
– संभाजी श्रीरामजी रेवाळे.

मनातील कविता
आपल्या इतक्या मनापासून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आणि भरभरून दिलेल्या शुभेच्छांबद्दल खूप खूप आभार 🙏🏻
असेच संवेदनशील मन मलाही लाभावे हीच कवीवर्य नारायण सुर्वे यांच्या चरणी आणि आपल्या सर्व रसिकांचे चरणी प्रार्थना 🙏🏻
– Gauri Kansara

लालबत्ती
डॉ.राणी मॅडम आपण करत असलेल्या या महान कार्याला माझा साष्टांग प्रणाम…
सरकार किंवा अनेक मोठमोठी मंदिर – मज्जीद किंवा धार्मिक स्थळे अनेक प्रकारच्या धर्मशाळा, मंदिरे मज्जिद उभा करतात परंतु अशा अनावरण मुलांसाठी अनाथ मुलांसाठी किंवा असे बेसहारा झालेल्या या नाजूक जीवनासाठी जाणीवपूर्वक प्रचंड प्रमाणात प्रयत्न करताना कोणीही दिसत नाही.
यासाठी तालुका, जिल्हा स्तरावर मोठे मोठे वस्तीग्रह शासनामार्फत, धार्मिक संस्थांना मार्फत उभा करून देशातील सर्व देणगीदारांनी उद्योगपती मदत केली पाहिजे.जेणेकरून ती मुले या सर्व वातावरणातुन बाहेर येतील… भविष्यात सन्मानाने जगतील.. देश सेवा करतील या साठी प्रयत्न केला पाहिजे..

धन्यवाद डॉ.राणी खेडीकर मॅडम….
– श्री. अंकुशराव तानाजी

मदन लाठी यांचा आदर्श उपक्रम
Sh Bhujabal Sir,
Good evening,
This Is a very nice and beautiful way to serve the society.
Thanks & Regards
– Dr Ramesh Shivnarayan Lathi, Jalgaon

मनातील कविता…
डॉ.गौरी मॅडम आपण कविवर्य कै. नारायण सुर्वे यांचा जीवन पट उलगडून दाखवला आणि त्यांच्या मनात समाजातील जातीयता, धर्मांधता, स्त्री-पुरुष भेदाभेद, गरीब आणि श्रीमंत यांच्यातील वाढत जाणारी दरी त्यांच्या प्रत्येकाच्या वेगळ्या समस्या यावर कविवर्यांनी आपल्या काव्य रचनेतुन नम्रपणे प्रहार केले आहेत. सर्व भारतीय जातीधर्माच्या भिंती पाडून मानवधर्म मानून समाज एक कसा होईल… यासाठी त्यांनी जीवनभर केलेल्या काव्यरचना…
जन्म झाल्याबरोबर नाळ तोडून आपल्या पोटच्या गोळ्याला कचराकुंडीत टाकताना आपल्या मातेच्या मनातील अनेक प्रकारच्या विवंचना त्यांनी आपल्या काव्यातून मांडल्या आहेत.ज्या अनामिक मातेने त्यांना जन्म दिला व टाकले त्याबद्दल त्यांनी आपल्या मातेचा तिरस्कार त्यांनी कधीच केला नाही. जीवनभर त्या मातेची ते प्रतिक्षा करत राहीले… फक्त एक च अपेक्षा की त्या मातेने मला एकदा तरी कुशीत घ्यावे….
कविवर्य नारायण सुर्वे खरोखरच नावाप्रमाणेच सुर्यासारखे प्रखर व स्वच्छ काव्यरचना करुन समाजमनातील समस्या मांडल्या…
डॉ.गौरी जोशी मॅडम खूपच छान…
आपले हार्दिक हार्दिक आभार
– श्री. अंकुशराव तानाजी

जीवन सार
जीवन सार सांगणारी कव्य रचना…
खूप छान मॅडम…
– श्री. अंकुशराव तानाजी

आणि, मी पोलिस अधिकारी झाले !
एका वेगळ्या वाटेवरचा साहसी कष्टमय प्रवास..
– राधिका भांडारकर

विजय दिवस
अतिशय सुंदर सुलभाताई…वाचताना अभिमानाने ऊर भरुन आले..
तुमच्या कवितेने तनु रोमांचीत झाली
– राधिका भांडारकर

ओठावरलं गाणं..
कधीही न विसरता येणार गाणं. लिखाण ही छान
– Gaurav

खूप सुंदर लिहिले आहे सर…
– pankaj padale

चहा पुराण !
मस्त, खुसखुशीत भाषा. चहाबाज लोकांना, म्हणजे मला आवडला.
– Mrs Lina Phatak

अज्यात मज्यात पिंटूच्या राज्यात ☺️
मेघना साने यांचे अभिनंदन!!
– राधिका भांडारकर

प्रकाशभंडारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली…!!
– राधिका भांडारकर

शतायुषी रामभाऊ जोशी.
माननीय रामभाऊ जोशी यांस शतायुषिच्या दिना निमित्त आदरपूर्वक खूप खूप शुभेच्छा ! जोशींच्या संपूर्ण कार्यभरारीस मानाचा सलाम ! प्रा. डॉ. ठाकूर सरांनी सुंदर लेख सर्वां समोर आणला, खूप धन्यवाद सर !
– सौ. वर्षा भाबल.

अष्टपैलू ग. दि. मा.
गदीमा..
दिव्यत्वाचीच प्रचीती..
त्यांच्या स्मृतीस आदरांजली..!!!
– राधिका भांडारकर

शतायुषी रामभाऊ जोशी.
रामभाऊ जोशी एक द्रष्टा पत्रकार आणि संपन्न व्यक्तीमत्व!!
त्यांना सादर प्रणाम!!
– राधिका भांडारकर

कुटुंब रंगलंय काव्यात – भाग – ८
प्रा.विसुभाऊ बापट यांनी लिहिलेल्या कोसबाडच्या
आठवणी वाचून डोळे पाणावले.अनुताईंच्या शब्दाला
मान देऊन विसुभाऊ तेथे आठ दिवस थांबले व तिथल्या
आदिवासी विद्यार्थ्यांना व डी.एड.च्या विद्यार्थ्यांना
छान छान कवितांची मेजवानी दिली.कुटुंब रंगलं काव्यात
या त्यांच्या कार्यक्रमाने प्रत्येक मराठी माणसाला वेड
लावलय.माय मराठीच्या या अमृतपुत्रास माझा मानाचा मुजरा.
– राजेंद्र र.वाणी

मदन लाठी यांचा आदर्श उपक्रम
श्री.मदन लाठी यांनी अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांसाठी
गहू तांदूळ पोहे इत्यादी रुपात भेट देऊन समाजापुढे मोठा आदर्श ठेवला आहे.थोरा मोठ्यांची भेट घेणे.
त्यांचा सन्मान करणे.त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे
तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळांना, वसतिगृहांना
अनाथालयांना मदत करणे अशा सेवा कार्यातून
श्री.मदन लाठी यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचे
फार मोठे समाज कार्य केले आहे.समाजसेवक मान.श्री.
मदन लाठी यांना माझा मानाचा मुजरा.
– राजेंद्र र.वाणी

सेवाज्योत : ज्योत्स्ना शेटे
मान.देवेंद्रजी भूजबळ यांनी सुलभ व सुंदर शब्दात
लिहिलेला ज्योत्स्नाताई शेटे यांच्यावरील लेख म्हणजे
आदर्श सेवाभावी मुख्याध्यापिकेला केलेला मानाचा मुजराच आहे.ज्योत्स्नाताईंच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला
मनापासून सलाम.ज्योत्स्ना ताईंसारख्या समाजातील
अशा गुणवंतांना हेरून त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहचवून
मान.देवेंद्रजी भुजबळ समाजापुढे मोठा आदर्श निर्माण
करीत आहेत.देवेंद्रजींच्या या अनमोल कार्यास माझा मानाचा मुजरा.
– राजेंद्र र.वाणी

अष्टपैलू ग. दि. मा.
खूप सुंदर लेखन

कमीत कमी शब्दात गदिमांच्या
कर्तृत्वाचा आलेख तुम्ही रेखाटला आहे

गदिमा ना तुम्ही वाहिलेली आदरांजली
मनात घर करून राहील

अभिनंदन
– विजय अनंत गोखले

शतायुषी रामभाऊ जोशी
सर्व गुण संपन्न व्यक्तीमत्व अशा रामभाऊ जोशी यांना
शतशः प्रणाम !! आणखी आयुष्यात काय मिळवावयाचे.
– Vijay Kulkarni

“स्किलबुक” जनक : डाॅ. किरण झरकर
देशातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी आणि युवा वर्गाचा प्रतिनिधी आणि भारताचे भविष्य असलेला विद्यार्थ्यीवर्ग यांच्या जीवनात क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणणारी जादूची कांडी म्हणजे डाॅ.किरण झरकर यांचा ‘ स्कील बुक ‘ प्रकल्प.याविषयावर मा.देवेंद्र भुजबळ यांचा लेख माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण आहे.अशाच लेखांतून या देशातील परिवर्तनाचे चक्र गतिमान होणार आहे !
– डाॅ.सतीश शिरसाठ.

आदर्श “मान्याची वाडी”
सर्वनी आन्गीकारली पाहिजे अशी कल्पना आहे. सुंदर लेख.
– Mayuresh

अतिशय उत्तम व अभिमानास्पद उपक्रम आहे. एक लहानसे गांव एकजुटीने किती मोठे, यशस्वी प्रकल्प अंमलात आणू शकते यांचे हे गांव खुप मोठे उदाहरण आहे. सुर्याची भरपूर उर्जा भारतांत उपलब्ध आहे. त्याचा प्रत्येक गांवानेच नाही तर मोठ्या शहरांनी पण फायदा घ्यावा. माहितीसाठी देवेंद्रजींचे आभार मानते.
– Mrs Lina Phatak

साथ जन्मोजन्मीची
नवरा-बायकोच्या नात्यांचे, त्यांच्या सहजीवनाचे सुरेख, वास्तववादी वर्णन. सर्जेराव पाटील, कविता छान आहे. 👏👏
– Mrs Lina Phatak

आदर्श “मान्याची वाडी”
अतिशय आदर्श प्रकल्प..
खरोखरच गावकर्‍यांची एकी, गग्रामसभेचा प्रभाव ,प्रत्येक सभासदांचा सहभाग,विकासाच्या वाटेवर राजकीय पक्ष आणि राजकारण न आणल्यामुळे गावाचा होणारा कायापालट ही अत्यंत
प्रशंसनीय बाब आहे..
– राधिका भांडारकर

जीवेत शरद: शतम
समाज मनाचे भान आणि देशातील वास्तव परिस्थिती, दीन दलित, शेतकरी यांच्या प्रश्नांची, ग्रामीण भारताच्या विकासाची जान व भान असलेले दृष्टे जानकर नेते …..
खंबीरपणा आणि संघर्ष या दोन शब्दांचा अर्थ काय असतो ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतरचे एकमेव द्वितीय मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांनी शतायुषी व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
– श्री. अंकुशराव तानाजी

प्रबोधनकारांवर लघुपट – सुभाष देसाई
प्रबोधनकार यांचे विचार जसे होते तसे परखड व सत्यवादी बाजू मांडणारे.. समाजापुढे आले तर समाजमनातील बरीच किल्मिश दूर होतील… आणि लोकांना वास्तव आणि अवडंबर यातील फरक समजायला लागेल. आज लोक वास्तवाला व वैज्ञानिक गोष्टीना फाटा देउन काल्कपनिक कथा, र्मकांडात आणि अवडंबर
यांनाच सत्य मानत आहेत…..
हे विचार लघुपट तसेच टी. व्ही. सिरीयल, शालेय अभ्यासक्रम त्यातुनही समाज मनावर स्थापीत करावा असे मला वाटते…
– श्री. अंकुशराव तानाजी

बातमीदारी करताना – भाग – १६
Nice article.RIP Kutti sir.
– Umesh Thakur

जीवेत शरद: शतम
विलक्षण चतुर ,धोरणी अष्टावधानी आणि सावध राजकीय नेता..
त्यांच्या कार्यक्षमतेला सलाम!!
– राधिका भांडारकर

नकळत…
पाऊस फारच छान.
चिंब भिजवून गेला..
– राधिका भांडारकर

आपली नवी मुंबई
पूर्ण भारतात 1नंबर आहे याचा रास्त अभिमान वाटतो.
नवीन तंत्रज्ञान सुरू केल्याबद्दल खूप आभार
🙏🏻खूप छान माहिती मिळाली
केरळ अदरपली धबधबा माहिती mastach 👌🏻
सर्जेराव पाटील ऑस्ट्रेलिया यांची साथ जन्मो जन्मीची कविता खूप छान👍👍👍

प्रबोधनकार यांच्यावर माहितीपट येत आहे ही खूप छान बातमी आहे.त्यांचा बद्दल आम्हाला अतिशय आदर आहे

माननीय शरदजी पवार 81 वर्ष पूर्ण करत आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा .त्यांचा सांगितलेला किस्सा खूपच छान वाटला त्याबद्दल धारव यांना धन्यवाद🙏🏻

चित्रगीत अप्रतिम .
खूप खूप शुभेच्छा देवेंद्र भुजबळ साहेब आणि खूप धन्यवाद🙏🏻

मन्या ची वाडी सौर ग्राम झाले वाचून आश्चर्य वाटले आणि कौतुकही वाटले .
मदन लाठी यांचा आदर्श उपक्रम स्तुत्य च आहे. अनाथ मुलांचा इथे विकास होत आहे . वाचून बरं वाटलं.आनंद गाटे व पूजा गाटे यांचे विशेष अभिनंदन💐

प्रगती मिशन छान समाजभूषण या पुस्तका करिता श्री भुजबळ यांचे अभिनंदन💐
भारती महाजन यांनी सुरेखा शहा साहित्य प्रेमी यांच्या बद्दल दिलेली
माहिती सुंदर👌🏻
माननीय मनीषा पाटील यांचे हिरकणी पुरस्कार मिळाल्या बद्दल विशेष अभिनंदन💐
प्रा.डॉ.किरण ठाकूर यांचे नावातील सध्यर्म सदर गमतीशीर😄👍
श्री विलास कुलकर्णी यांची चांदोमामा कविता खूप छान👍👌🏻
खूप छान न्यूज स्टोरी धन्यवाद भुजबळ साहेब आणि प्रिय मैत्रीण अलका💐
– सुप्रिया सावंत

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री मधु मंगेश कर्णिक
शितल अहेर on रेघोट्या…
शितल अहेर on हास्य दिन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on समस्यांना कॉमा करा आणि पुढे जा…– अलका भुजबळ
सौ.मृदुलाराजे on कामगार चळवळीचा इतिहास