Saturday, July 19, 2025
Homeसाहित्यवाहतो चिंतनातील फुले…

वाहतो चिंतनातील फुले…

(दशाक्षरी)

चुकतो माणूस कधीतरी
मान्य करण्या हवा विनय ।
माणुसकीचे दर्शन होता
जीवनात आशेचा उदय ।।१।।

रागवावे तरी कशासाठी
रोष नसताना मनामध्ये ।
दोषाला दूर सारता क्षणी
उजळे प्रतिमा जनामध्ये ।।२।।

अंधारता सर्व दाही दिशा
तांबड फुटता रवि आला ।
उभरत्या या कवी मनाला
मार्ग मिळे उजळता ज्याला ।।३।।

माणसाच्या जीवनात रहा
जिवाभावाचा साथी म्हणून ।
सुखदुःखाच्या या सागरात
हाक त्याची माणूस बनून ।।४।।

गुरुजनांची वचने पहा
आशिष राहो मातापित्यांचे ।
समृद्धी सुखांकाचे दानात
प्रेम लाभो जीवनी जनांचे ।।५।।

आयुष्य व्हावे इंद्रधनुष्य
सप्तरंग उधळोत खुले ।
जीवनाच्या समृद्धतेला
वाहतो चिंतनातील फुले ।।६।।

अरुण पुराणिक

— रचना : अरुण पुराणिक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments