आपण आपल्या स्वानुभवावरून बऱ्याचदा बोलताना सहजपणे म्हणतो की, सरकारने हे केले पाहिजे, ते केले पाहिजे वगैरे.
पण आपल्याला याची खंत वाटत असते की, आपले कोण ऐकेल ?
आता मात्र आपल्या मनातील विचारांना वाचा फोडण्याची, आपल्या कल्पना सरकारकडे पोहोचवण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
“विकसित भारत” च्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार “विकसित महाराष्ट्र २०४७” साठी एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करीत आहे. नागरिकांच्या आकांक्षा प्रतिबिंबित होण्यासाठी नागरिक सर्वेक्षण केले जात आहे.
या सर्वेक्षणाद्वारे, नागरिकांना सहभागी होण्यासाठी आणि “विकसित महाराष्ट्र २०४७” च्या व्हिजनला आकार देण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.
या सर्वेक्षणात ७ सोपे प्रश्न विचारले आहेत. आपण त्यापैकी पर्याय निवडू शकता, लिहू शकता आणि आवाज रेकॉर्ड करू शकता.
चला तर मग, वेळ कशाला घालवता ? पुढील लिंकवर क्लिक करून सर्वेक्षणात सहभागी व्हा आणि नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800