चित्रकलेचे कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता, स्वतःच्या प्रेरणेने चित्रकार झालेल्या सौ. वृषाली हेमंत सामंत यांच्या एकल चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन हे उद्या; शुक्रवार, दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता पु . ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी, प्रभादेवी, मुंबई – ४०००२५ येथे होत आहे. हे प्रदर्शन ५ ऑगस्ट २०२५ पर्यंत असणार आहे.

या प्रदर्शनात वृषाली हेमंत सामंत यांच्या कलाकृतींचा प्रवास, विविध चित्र प्रयोग आणि अभिव्यक्ती मांडण्यात येणार आहे. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे माजी अधिष्ठाता वाघमारे सर, पद्मश्री उदय देशपांडे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. संदीप चव्हाण, गायिका केतकी भावे – जोशी, चित्रपट कलानिर्देशक श्री. अजित नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800