Wednesday, July 2, 2025
Homeबातम्या"शब्दशिल्प" सन्मानित

“शब्दशिल्प” सन्मानित

अलिबाग येथे साहित्य संपदा तर्फे शब्दशिल्प कलाविष्कार संघ साहित्य परिवारास नुकताच “मराठी दीपस्तंभ” पुरस्कार प्रदान करण्यात आला.

साहित्य संपदा या साहित्यिक परिवार/प्रकाशन संस्थेने साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करून साहित्यिक घडवून अभिजात मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करून साहित्यिक रुची निर्माण करण्यात बहुमोल योगदान देणाऱ्या साहित्यिक संस्थांना मराठी दिपस्तंभ पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यात शब्दशिल्प कलाविष्कार संघ साहित्य परिवाराचीही निवड झाली.

हा पुरस्कार शब्दशिल्प कलाविष्कार संघ साहित्य परिवाराच्या आयोजक हिरकणी सौ. गीतांजली वाणी, कवी मयूर पालकर, सदस्य अश्विनी बोलके यांनी स्वीकारला.

यावेळी व्यासपीठावर मा. अनंत देवघरकर, मा. शेख सर, मा. सुनील चिटणीस, मा. रमेश धनावडे, मा. ऍड.विलास नाईक, साहित्यसंपदा संस्थापक मा. वैभव धनावडे आदी मंडळी उपस्थित होती.

मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून साहित्यसंपदा आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलन अलिबाग येथे नुकतेच पार पडले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे. मराठी भाषा प्रचार प्रसार ध्येय समोर ठेवून मराठी साहित्य कला आणि संस्कृती याचा संगम ह्या साहित्यिक संस्था कार्यातून दर्शवितात. मराठी दिपस्तंभ पुरस्कार मिळाल्याने आतापर्यंत केलेल्या कार्याचे सार्थक झाले आणि पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन व नवीन ऊर्जा मिळेल असा विश्वास पुरस्कार प्राप्त संस्था परिवाराकडे बघून दिसत होता.

शब्दशिल्प कलाविष्कार संघ गेली चार वर्षे यशस्वी कार्यरत आहे. विविध साहित्यिक प्रकार ऑनलाईन विनामूल्य शिकवले जातात, उपक्रम आयोजन तथा स्पर्धा आयोजनातून ऑनलाईन सन्मानपत्र, कधी रोख बक्षिसे देखील देऊन प्रोत्साहन दिले जाते. संस्थेने दोन ऑफलाईन कार्यक्रम यशस्वी केले आहेत त्यात एक राज्यस्तरीय काव्यसहल जेथे संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रतिनिधिक काव्यसंग्रह नवरंगचे प्रकाशन अगदी पारंपरिक ग्रंथ दिंडी काढून झाले होते. काव्य सहलीत एकूण ऐशी सास्वत सहभागी झाले होते.

दुसरा ऑफलाईन कार्यक्रम राजमाता जिजाऊ काव्यसंमेलन आयोजन यशस्वी झाले. या सोहळ्यास एकूण १६५ सारस्वत सहभागी झाले होते. ऐशी कविता सादरीकरण आणि साहित्य क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या ५० दिग्गज मंडळींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. संस्थेने विविध साहित्य प्रकार शिकवणाऱ्या ऑनलाईन ५० कार्यशाळा घेतल्या आहेत. संस्थेचे भिन्न आयोजन यशस्वी करण्यासाठी समस्त आयोजक हिरकणी गीतांजली वाणी, चंदन तरवडे, सपना भामरे, मयूर पालकर, मिनल बधान, अर्चना नावरकर, प्रियंका कोठावदे मेहनत घेऊन नवनवीन संकल्पना राबवून सहभागी सारस्वतांना प्रोत्साहन देत असतात.
संस्थेला पुढील कार्यासाठी उपस्थित सर्व सारस्वतंकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४